सेबामेड – केवळ विज्ञानाच्या आधारावर आपल्या केसगळतीचे उपाय करण्याचे आवाहन करत आहे

पुणे –  सेबामेड या ५० वर्षांहून अधिक दीर्घ वारसा असलेल्या जर्मन पर्सनल केअर ब्रॅण्डने आपल्या केसगळतीला प्रतिबंध करणाऱ्या शॅम्पूवर लक्ष केंद्रित करत “#सिर्फ साइंस की सुनो  अभियान” सुरू केले आहे. आपल्या बार कॅम्पेनशी सुसंगती राखत, ब्रॅण्डने पुन्हा एकदा ग्राहकांना केसगळतीबद्दल नवीन ज्ञान दिले आहे आणि भक्कम वैज्ञानिक संशोधनाचे पाठबळ असलेला उपाय निवडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले आहे. अँटि हेअर लॉस शॅम्पूशिवाय, सेबामेड आपल्या अँटि-डँड्रफ व दैनंदिन वापराच्या शॅम्पूंच्या श्रेणीद्वारे, कोंड्यावर (डँड्रफ) उपाय देत आहे तसेच दैनंदिन देखभालीच्या गरजाही  पूर्ण करत आहे.

सेबामेड इंडियाचे कंट्री हेड शशी रंजन म्हणाले,“सेबामेड इंडिया केस तुटणे व केस गळणे यांमधील फरक स्पष्ट करून चिकित्सक ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करत आहे. सेबामेड अँटी हेअर लॉस शॅम्पू हे एक नवोन्मेषकारी उत्पादन असून, सध्या बरीच गर्दी झालेल्या शॅम्पू विभागाच्या चाकोऱ्या ते मोडून टाकेल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. यातील अनन्यसाधारण एनएचई मिश्रण पीएच ५.५ च्या लाभासह केवळ केस तुटण्याची समस्या सोडवणार नाही, तर मुळाशी असलेल्या समस्यांवर मात करून केसगळतीही कमी करेल.

सेबामेड इंडियाच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख कोणार्क गौर या अभियानाबद्दल म्हणाले,“सेबामेड सत्यतापूर्ण जाहिरातींसाठी वचनबद्ध आहे आणि ग्राहकांना केलेले वायदे पूर्ण करत आली आहे. अँटि-हेअर फॉल शॅम्पू विभागाबाबतच्या ग्राहकांच्या वैफल्याबद्दल आम्ही माहिती घेतली आणि वायदा व प्रत्यक्ष उत्पादन यांतील फरक आम्हाला समजला. या अभियानामधून सेबामेड आपल्या विज्ञानाधारित अँटी-हेअर लॉस शॅम्पूमार्फत ही दरी भरून काढण्याचा वायदा करत आहे. हा शॅम्पू केवळ केसांचे तुटणे कमी करत नाही, तर तो केसांना मुळातून मजबूत करतो.”

द वुम्बचे सह-संस्थापक नवीन तलरेजा म्हणाले,“बाथिंग बार विभागातील सेबामेडच्या यशानंतर पर्सनल केअर ब्रॅण्डची श्रेणी उभी करण्यासाठी योग्य वेळ होती. हे शॅम्पू गुणकारी व विज्ञानावर आधारित आहेत आणि पीएच ५.५ मुळे ते अन्य शॅम्पूंच्या तुलनेत वेगळे ठरतात. केस गळणे हा ग्राहकांसाठी अत्यंत दु:खद विषय असतो पण केस तुटणे व केस गळणे यांबाबत ग्राहकांना असलेली माहिती खूपच मर्यादित असते. ग्राहकांना या दोन बाबींमधील फरकाबद्दल शिक्षित करणे आणि अनन्यसाधारण एनएचई फॉर्म्युलाच्या मदतीने त्यांची खरी समस्या सोडवणे हा या अभियानाचा खरा हेतू आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: