भारताला स्वतःचा ‘क्रुझ लायनर’ मिळाल्याने पर्यटन क्षेत्राला चालना

पुणे, दि. २३- जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात राबविला गेल्यानंतर आता ट्रॅव्हल इंडस्ट्रीने नव्या उमेदीने पुन्हा उचल घेतली आहे. कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षभरात सर्वात मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसला. त्यातून बाहेर पडण्यासाठीचा हा मोठा मार्ग आहे. ड्रीम हॉटेल ग्रुपशी संलग्न  असलेले वॉर्ड्वेज लेझर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड द्वारा कर्डेलिया जलपर्यटन, हा उपक्रम मे २०२१ पासून भारतात सुरु होणार आहे. या प्रीमियम क्रुझ लायनरने भारताच्या पूर्व व पश्चिम किनारे उदा. गोवा, दिव आणि लक्षद्वीप तर आंतरराष्ट्रीय कोलोम्बो, गाल्ले, त्रिन्कॉमाली, जॅफ्फना व मालदीवज या किनाऱ्यांची सैर करता येणार आहे.

‘कॉर्डेलिया क्रूझ’
वॉटरवेज लेझर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने कर्डेलिया क्रूझ या पहिल्या ब्रँड अंतर्गत, भारतीय जलपर्यटन उद्योगात सुरुवात केली आहे. ही संस्था हॉटेल आणि ब्रँड मॅनेजमेंट कंपनी असलेल्या ड्रीम हॉटेल ग्रुपशी संलग्न आहे. ड्रीम हॉटेल ग्रुपला जगभरातील मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याचा ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

भारतीय क्रूझ बाजाराच्या संभाव्यतेवर विश्वास असल्याचे सांगून ड्रीम हॉटेल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण संतसिंग चटवाल म्हणाले, “गेल्या तीन दशकांपासून सर्व ब्रँडसनी मिळवलेले यश हा आमचा पाया आहे. आम्ही जगभरातील समुद्रपर्यटन पर्यटनाची वाढ आणि विकास पाहिले आहे. ७५०० किमी किनारपट्टीसह आणि किनारपट्टीच्या विकासासाठी भारत सरकारने नुकत्याच केलेल्या प्रयत्नामुळे भारत जलपर्यटन करण्यास सज्ज झाला आहे. जलपर्यटन क्षेत्रात विकासाची प्रचंड क्षमता आहे आणि आम्हाला खात्री आहे की यात ‘कॉर्डेलिया क्रूझ’ आपल्या नाविन्यतेमुळे व अनुभवाच्या जोरावर या नव्या युगात नक्कीच अग्रगण्य ठरेल. जगभरातील जलपर्यटकांसाठी भारतातील हे जलपर्यटन एक आश्चर्यकारक अनुभव असेल.” या ग्रुपची भारतातील क्रूझ क्षेत्राच्या विकासासाठी पुढील ३ ते ५ वर्षात अंदाजे ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आहे.

भारतीयांचे भारतीयांसाठी समुद्र पर्यटन : जागतिक दृष्टीकोन, स्थानिक विचार
वॉटरवेज लेझर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष जर्गन बालोम विश्वासाने सांगतात की, “२०२१ पर्यंत भारतीय जहाजाच्या सुट्टीचा अनुभव घेण्यासाठी युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियासारख्या ठिकाणी प्रवास करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना समोर आणली असून त्याचाच अवलंब करत आम्ही ‘भारतीयांचे भारतीयांसाठी’ समुद्र पर्यटन आणत आहोत आणि याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आता एक उदाहरण प्रस्थापित करत जगाला हे दाखवून देण्याची वेळ आली आहे की या महाभयंकर महामारीनंतर भारत पुन्हा नव्या जोमाने समुद्री पर्यटन क्षेत्रात उतरला आहे.” भारतातील जलपर्यटन उद्योगात सहकार्य, विकास आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने मेरीटाइम इंडिया समिट २०२१ च्या प्रारंभाच्या वेळी मुंबई पोर्ट ट्रस्टबरोबर वॉटरवेज लेझर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडने ‘लीड बाय एक्षाम्पल’ हा सामंजस्य करार केला आहे, ही एक विशेष उल्लेखनीय बाब आहे. जर्गन बालोम यांना जलपर्यटन क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असून त्यांना खात्री आहे की, भारतीय समुद्री पर्यटनाची प्रगती होऊन त्यात २०२२ पर्यंत अंदाजे २ दशलक्ष रोजगार संधी निर्माण होऊ शकते.

आगामी काळात अजून क्रुझ वाढवून अधिकाधिक भारतीय पूर्व व पश्चिम किनाऱ्यांना यात सामावून घेता यावे असा संस्थेचा मानस आहे. संस्थेचे विक्री व विपणन संचालक विजय केसवान म्हणतात, “समुद्रपर्यटनसारख्या संभाव्य क्षेत्रात गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. वेगळा अनुभव देणाऱ्या सुट्ट्या हे मुख्य आकर्षण ठरेल. भारतात सुमारे पन्नास दशलक्षाहूनही कमी लोकांना समुद्रपर्यटन अनुभवले आहे. ही संधी निर्विवाद आकर्षक आहे. भारतात क्रूझ मार्केट उघडल्यामुळे २०२२ पर्यंत समुद्रपर्यटकांची संख्या १ लाख ८० हजाराहून ४० लाखांवर जाईल. आम्ही इतिहास घडवणारे पाऊल उचलत आहोत.”

जागतिक स्तरावरील आणि दर्जेदार सुविधा
आंतरराष्ट्रीय सुट्टीच्या मानकांच्या बरोबरीने सुविधा व सेवा असलेल्या कॉर्डेलिया क्रूझने मे २०२१ पासून २, ३, ४, ५ आणि ७-रात्रींचे कार्यक्रम सुरू केले आहेत. निवास, बोर्ड जेवण, करमणुकीचे सर्वाधिक पर्याय उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे विलासी, अत्याधुनिक सुट, खासगी बाल्कनी केबिन, समुद्री दृश्ये आणि आतील शानदार भाग या अधिक सुविधा असतील. जेवणाचा विचार करतांना खास भारतीयांचा विचार करत त्यांना भारतीय पद्धतीचे पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय जागतिक, स्थानिक व त्या-त्या स्थळांची खासियत असलेले पदार्थही येथे उपलब्ध असतील. तसेच येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जैन किंवा अजून काही खास गरजा असणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मागणीप्रमाणे देखील पदार्थ बनवून मिळू शकतात. सर्व काही असलेला हा उत्कृष्ट पाहुणचार आणि सेवा यांचा संपूर्ण नवीन समुद्रपर्यटन अनुभव सर्वांसाठीच खुला करण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: