सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजचा १७ वर्षीय आदित्य गिरीबनला सर्वात तरुण चित्रपट निर्माता

पुणे : सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजमधील १७ वर्षीय आदित्य गिरी सर्वात तरुण चित्रपट निर्माता ठरला आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने अभ्यास करतानाच पाच म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. लॉकडाऊनमध्ये घरी असताना वेळेचा सदुपयोग करण्याच्या कल्पनेतून आदित्यने अभ्यासासोबतच त्याच्या स्वप्नातल्या चित्रपटांवर काम करायला सुरुवात केली. त्यासाठी ‘सेव्हन युनिक फिल्मस’ या स्टार्ट-अप प्रॉडक्शन हाऊस सुरु केले. या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून नुकतेच त्याचे ‘ना तू मिली’ हे गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्यानिमित्ताने सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे आदित्यचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्रा. सिद्धांत चोरडिया, प्रा. हिना मोराणकर आदी उपस्थित होते.

आदित्य गिरी म्हणाला, “मला खूप कमी वयात एवढे मोठे काम करायला मिळतेय, याचा आनंद वाटतो. माझी सर्व स्वप्ने साकार करण्यासाठी आणखी परिश्रम घेणार आहे. ‘ना तू मिली’ गाण्यानंतर आणखी पाच गाणी तयार केले आहेत. तेही लवकरच प्रदर्शित करण्यात येणार असून, गाण्यांसोबतच वेबसिरीज आणि चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येतील. निर्माता म्हणून अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. कुटुंबीय, कॉलेजकडून होत असलेले कौतुक प्रेरणादायी आहे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “आपल्यातील सर्जनशीलतेला योग्य दिशा मिळाली की, आयुष्य आपोआप सुंदर होते. आपले आयुष्य फक्त कर्तव्यदक्ष नाही, तर सुंदर असावे. आपल्याला सुचणाऱ्या कल्पक गोष्टी साकारायचा सर्व बाजूने प्रयत्न केला पाहिजे. सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजमध्ये तरुण निर्माता आहे, याचा मला अभिमान वाटतो. त्याच्या कामाचे कौतुक आहेच; परंतु लॉकडाऊनचा सदुपयोग केल्याने जास्त आनंद झाला आहे. त्याला भविष्यातील प्रकल्पांसाठी सुयश चिंतितो. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट नेहमीच आदित्यच्या सोबत राहील. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळावे, तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी मुलांच्या आवडी-निवडीनुसार झुंबा-फ्युझन डान्सेस, परफॉर्मिंग आर्टस्, इनडोअर-आउटडोअर क्रीडा स्पर्धा, ब्युटी वेलनेस, अनिमेशन, शॉर्ट फिल्म मेकिंग असे विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते. त्यातून अशा कल्पना मुलांना सुचतात. आदित्यनेही या गोष्टीचा उपयोग करत स्वतःचा स्टार्टअप सुरु केला, याचा आनंद आहे.”
आदित्य त्याच्या प्रदर्शित होणाऱ्या म्युझिक व्हिडिओ, चित्रपट आणि वेबसिरीजविषयी उत्सुक आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये युट्युबवर त्याचे एक लाख अठ्ठावीस हजार सब्स्क्रायबर आहेत. तसेच ‘सेव्हन युनिक रेकॉर्डर्स’ म्हणून त्याचे इंस्टाग्राम अकाऊंटही आहे. त्याचा प्रत्येक व्हिडिओ जवळपास पाच लाख लोकांनी बघितला आहे. ‘ओ साथी’ हे नवीन गाणे येत्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या यशामुळे पालक, वर्गातील मित्र आनंद व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: