महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान आंतरराज्यीय बसेसची वाहतूक ३१ मार्चपर्यंत बंद

मुंबई – कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे आता कोरोनाला आवरण्यासाठी कठोर निर्बंध घातले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कडक नियम तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. दरम्यान आता प्रवासावर देखील काही निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरराज्यीय बससेवा बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान आंतरराज्यीय बसेसची वाहतूक २० मार्चपासून ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती मध्य प्रदेशच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: