Saturday, May 30, 2026
SportsTOP NEWS

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली – भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे असून मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. तर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दरम्यान, 23 मार्चपासून पुण्यात ही मालिका खेळविली जाणार आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
23 मार्च – पहिला सामना
26 मार्च – दुसरा सामना
28 मार्च – तिसरा सामना

भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading