कोरोना – राज्यात आज 25 हजारहून अधिक नवीन रुग्ण
मुंबई – राज्यातील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने होत असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही वाढ निश्चिंतच धक्कादायक मानली जात आहे. कालपेक्षा आज जवळपास ३ हजारांनी रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यात खरंच लॉकडाऊन होणार का याबाबत प्रश्न विचारले जात आहे.,
गेल्या २४ तासांत २५ हजार ८३३ नवे रुग्ण सापडले तर, १२ हजार ७६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर ५८ हजार बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २३ लाख ९६ हजार ३४० रुग्णांना कोरोनाची लागण झाली, तर २१ लाख ७५ हजार ५६५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ५३ हजार १३८ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर, सध्या १ लाख ६६ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात शहरी भागात पुन्हा एकदा कोरोनाचा जोर वाढला आहे. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ५३ हजार १३८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ % एवढा आहे. आज राज्यात २५ हजार ८३३ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १२ हजार १७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख ७५ हजार ५६५ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.७९ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७९ लाख ५६ हजार ८३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख ९६ हजार ३४० (१३.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख १३ हजार २११ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढून १ लाख ६६ हजार ३५३ इतकी झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३५ हजार ५३९ इतका झाला आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात २४ हजार २०९, मुंबई पालिका हद्दीत १७ हजार १५३ तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ५४८ इतका झाला आहे. नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतही अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. मुंबई पालिका हद्दीत गेल्या २४ तासांत २ हजार ८७७ तर पुणे पालिका हद्दीत २ हजार ७९१ रुग्ण वाढले आहेत.
दरम्यान, आज राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एका दिवसात आढळले होते. आज २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे शहर ..!
………
- दिवसभरात 2752 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 885 रुग्णांना डिस्चार्ज.
- 22 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
226549 - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-16877
- एकूण मृत्यू – 5002
- एकूण डिस्चार्ज- 204670
