सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIAची कोठडी

मुंबई, दि. १४ – पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत एनआयएच्या (NIA) विशेष कोर्टाचा निर्णय समोर आला आहे. वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे १० दिवसांसाठी वाझेंची एनआयए कोठडीत रवानगी झाली आहे. एनआयएकडून सखोल चौकशीसाठी १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण १० दिवसांचीच कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता १० दिवसांची कोठडी संपल्यानंतर २५ तारखेला पुन्हा एकदा सचिन वाझे यांना एनआयए विशेष कोर्टात हजर केले जाणार आहे.

सचिन वाझे आणि रियाझ काझी यांची एकत्र चौकशी करण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक तपासादरम्यान रियाझ काझी हे त्यांच्यासोबत असायचे. काल सचिन वाझे यांची १३ तास कसून चौकशी केल्यानंतर एनआयएकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांनी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सखोल चौकशी करण्यासाठी एनआयएकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टात १० दिवसांसाठी वाझेंची एनआयए कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता यादरम्यान सचिन वाझे यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना एनआयएच्या कार्यालयात ठेवले जाईल.

पण या १० दिवसांमध्ये जर अधिक धागेदोर सापडले नाहीतर, पुन्हा एकदा वाझे यांना कोर्टात हजर करून एनआयए कोठडीची मुदत वाढून मागून शकते. दरम्यान आज एनआयएची कोर्टाला अशी महिती दिली की, मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके सापडण्यामागे मोठे षडयंत्र आहे. तसेच याप्रकरणात ज्याची नावे समोर येती त्या सर्वांची वाझेंसोबत चौकशी केली जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: