कॅडबरी ५ स्‍टारमध्‍ये ओरिओच्‍या क्रंचची भर

पुणे – माँडेलीझ इंडिया या कॅडबरी डेअरी मिल्‍क, कॅडबरी बॉर्नविटा आणि ओरिओ इत्‍यादी भारताच्‍या काही आवडत्‍या स्‍नॅकिंग ब्रॅण्‍ड्सच्या उत्‍पादक व बेकर्स कंपनीने आज कॅडबरी ५स्‍टार ओरिओच्‍या लाँचची घोषणा केली. यासह कंपनीने त्‍यांचा प्रिमिअम स्‍नॅकिंग पोर्टफोलिओ अधिक प्रबळ केला आहे आणि पुन्‍हा एकदा ग्राहकांना अधिक निवडींचा पर्याय दिला आहे. ओरिेओचे क्रीमीनेस व क्रंचीनेस आणि कॅडबरी ५स्‍टारचे चॉकलेटी कॅरमल झेस्‍टचे हे अद्वितीय संयोजन सँडविचमध्‍ये आहे, ज्‍याचा सतत नवीन आस्‍वादांचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांच्‍या चवींमध्‍ये अधिक स्‍वादाची भर करण्‍याचा मनसुबा आहे. चॉकलेट, कॅरमल, ओरिओ क्रीम व बिस्किट चंक्‍सचे स्‍तर असलेला हा ५स्‍टार ओरिओ तुम्‍हाला प्रत्‍येक बाइटमध्‍ये स्‍वादिष्‍ट चव देतो.

या नवीन आविष्‍काराबाबत बोलताना माँडेलीझ इंडियाच्‍या मार्केटिंग (चॉकलेट्स), इनसाइट्स अॅण्‍ड अॅनालिटिक्‍सचे वरिष्‍ठ संचालक अनिल विश्‍वनाथन म्‍हणाले, ”चॉकलेट्समधील बाजारपेठ अग्रणी आणि बिस्किट्समधील प्रबळ चॅलेंजर्स असल्‍याने ग्राहकांना योग्‍य क्षणासाठी योग्‍य पद्धतीने बनवलेले योग्‍य स्‍नॅक देत भावी स्‍नॅकिंगचे नेतृत्‍व करण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहणे ही आमची जबाबदारी आहे. या लाँचसह आमच्या प्रिमिअम पोर्टफोलिओच्‍या विकासगतीला चालना देण्‍याचा आणि वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍यासाठी सर्वोत्तम नवोन्‍मेष्‍कारीवर लक्ष केंद्रित करण्‍याचा आमचा मनसुबा आहे. आमचा विश्‍वास आहे की, कॅडबरी ५स्‍टार ओरिओ हे दोन सदाबहार युवा ब्रॅण्‍ड्स प्रतिष्ठित चॉकलेट व बिस्किट विभागाचे उत्तम संयोजन आहे, जे कॅडबरी ५स्‍टारच्‍या प्रतिष्‍ठेला अधिक पुढे घेऊन जाईल आणि विभागातील उपस्थितीला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल. या नवोन्‍मेष्‍कारामधून कॅडबरीची ओळख बारपलीकडे विस्‍तारित करण्‍याचे आमचे अविरत प्रयत्‍न दिसून येतात. ज्‍यामुळे आम्‍हाला नवनवीन स्‍नॅकिंग पर्याय शोधून काढण्‍यामध्‍ये आणि स्‍नॅकिंग क्षेत्राप्रती ग्राहकांची आवड वाढवण्‍यामध्‍ये मदत होत आहे.”

बहुस्‍तरीय कॅडबरी ५स्‍टार ओरिओच्‍या लाँचला सर्वांगीण एकीकृत मार्केटिंग कम्‍युनिकेशनचे पाठबळ असेल, ज्‍यामध्‍ये प्रबळ डिजिटल, नवोन्‍मेष्‍कारी आऊटडोअर, प्रबळ इन-स्‍टोअर व्हिजिबिलिटी व सहभाग निर्माण प्रभावी कृतींचा समावेश आहे. ३५ रूपये किंमत असलेली कॅडबरी ५स्‍टार ओरिओ आतापर्यंतचा सर्वात स्‍वादिष्‍ट व क्रंची अनुभव देण्‍यास सज्‍ज आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: