पुण्यात लॉकडाउन नाही, मात्र निर्बंध कडक

पुणे, दि. १२ – कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने पुण्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत. एमपीएससीची परीक्षा असल्याने कोचिंग क्लासेस, ग्रंथालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. तसेच धार्मिक विधी, लग्नसमारंभासाठी पुर्वपरवानगी आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

शहरातील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यासह रात्रीच्या संचारबंदीचे निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याने ३१ मार्च शाळा बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. करोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने हे निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन स्वरूपातील शिक्षण सुरूच राहणार असल्याचे यात स्पष्ट केले गेले आहे. तसेच, रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान विनाकारण बाहेर फिरण्यावर घातलेले निर्बंध कायम राहणार असल्याचे नमूद केले आहे.

शहरातील करोना रुग्णसंख्याची वाढ आहे. नागरिकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून शहरात १५०० हून अधिक रुग्णांना करोनाची बाधा होत आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध वाढविण्यात आले आहेत. शहरात सध्या लसीकरणावर भर दिलेला आहे. मॉल्स, हॉल, रात्री दहा वाजता बंद होतील. सार्वजनिक वाहतूक ५० टक्के आसन क्षमतेसह सुरू राहील.

हॉटेल १० पर्यंत पार्सल ११ पर्यंत

५० टक्के ग्राहक क्षमतेसह हॉटेल सुरू राहतील. तसेच १० नंतर ऑनलाइन ॲपवरून बुकिंग आणि पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे त्यामुळे गर्दी करू नये असे आवाहन राव यांनी केले आहे.

असे असतील निर्बंध

३१ मार्च शाळा काँलेज बंद राहतील

रात्री अकरा ते सहा संचारबंदी

रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल सुरू

हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमता आवश्यक

लग्न धार्मिक कार्यक्रमांना ५० जणांनाच परवानगी

मॉल्स आणि सिनेमागृहे रात्री दहा पर्यंत सुरू राहतील

Leave a Reply

%d bloggers like this: