MPSC परीक्षा २१ मार्चला होणार

मुंबई, दि. १२ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजीची नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० पुढे ढकलली होती. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. दिवसभराच्या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शनिवारी परीक्षेचा तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. यानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धी पत्रक जाहीर करत येत्या २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: