साईनगरी सोसायटीतील महिला सफाई कामगारांचा सत्कार

पुणे – जागतिक महिला दिन व महाशिवरात्री निमित्त कल्याणीनगर येथील साईनगरी सोसायटीतील महिला सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने त्यांना रेशनिंग किट, साडी व मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

मागील वर्षभरात कोरोना संक्रमण कालावधीत सोसायटीच्या आवारात स्वच्छतेचे महत्वपूर्ण काम प्रामाणिकपणे करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यां बद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती सोसायटीतील सदस्या पुनम मोहिते यांनी दिली.

यानिमित्ताने देवीबाई राठोड,कमलाबाई चव्हाण जैनांबाई राठोड तसेच सोसायटीतील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सोसायटीतील मान्यवर संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी साई नगरी सोसायटीचे अध्यक्ष समीर चौधरी,सचिव हृषीकेश जाधव,कोषाध्यक्ष राजेश ढोमणे तसेच सोसायटीतील संचालक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: