जिजाऊ, सावित्री, रमाई यांचे आदर्श कार्य व विचार आचरणात आणा – मुक्ता लोंढे

पुणे, दि. 12 – – “महिलांनी सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे. जिजाऊ, सावित्री, रमाई यांचे आदर्श कार्य व विचार आचरणात आणून जीवनात यशस्वी व्हा” असे आवाहन कै. द. मु. आंबेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता लोंढे यांनी व्यक्त केले. रमामाता महिला मंडळाच्या वतीने डॉ.आंबेडकर सोसायटी सांस्कृतिक भवन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगला आहार, नियमित आरोग्य तपासणी यासोबतच स्वतःचा व इतरांचा सन्मान करून समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला पोलिस अधिकारी गीता जाधव, यांच्यासह माजी अध्यक्षा सरस्वती जगताप, पवित्राबाई सरोदे, निर्मला डिखळे, मंडळाच्या अध्यक्षा सुशीला कदम उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. छाया गायकवाड यांनी सावित्रीची ओवी सादर केली. विद्या गडकरी व महिला सहकाऱ्यांनी भीम गीतांसह सुंदर गाणी सादर केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सचिव रेखा चव्हाण, उपाध्यक्ष नमिता जाधव, सहसचिव योगिनी भोसले, स्वाती कांबळे, शोभा सपकाळ यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: