रामदास आठवले यांनी घेतली कोविड प्रतिबंधक लस

मुंबई दि. 12 – जीवन जगायची ओळखा नस; घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस ; आज आहे माझा सुदिन कारण मी घेतले आहे कोवॅक्सिन असे काव्य करीत कोविड लस बाबत कोणतीही शंका न बाळगता न घाबरता सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्यासह जे जे रुग्णालयात कोवॅक्सीन चा पहिला डोस घेतला.

यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ तात्याराव लहाने; डॉ संख्ये;डॉ व्ही पी काळे; डॉ सुरवसे डॉ प्रशांत होवाळ रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; गौतम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शकुंतला आठवले; बेला मेहता; रिपाइं चे घनश्याम चिरणकर; सचिन मोहिते; संदीप मोहिते; ‘पप्पा कन्नन यांनी सुद्धा कोवॅक्सीन चा पहिला डोस घेतला.

महाराष्ट्रात सध्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे.देशात एकूण कोरोना रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 70 टक्के रुग्णसंख्या वाढत आहे.महाराष्ट्रात कोरोना चा प्रसार वाढणे ही चांगली बाब नाही तर चिंतेची बाब आहे. राज्यात मोठे सार्वजनिक कार्यक्रम गर्दी चे कार्यक्रम बंद करावेत.सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवावे; मास्क वापरावा; सॅनिटाईझर चा वापर करावा कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: