“वाटेवरी मोगरा” या गाण्यामध्ये मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा

सागरिका म्युझिक , वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या त्यांच्या घरच्या कलाकारांच्या सुरेख गाण्यासह आपल्या “लव्ह सॉंग फेस्टिव्हल “चा ग्रँड फिनाले सादर करीत आहेत. निलेश मोहरीर यांनी “वाटेवरी मोगरा” या गाण्याची सुंदर रचना केली आहो. सागरिका म्युझिक सोबतच निलेशने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकाराने या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.

वैशाली आणि स्वप्नील ने सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत १०० हुन अधिक गाणं गायिली आहेत आणि त्यात हे गाणं पहिल्या १० मध्ये नक्कीच येईल. गाण्याचा ऑडिओ जर घरच्याच कलाकारांसोबाबत असेल तर व्हिडिओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे (ज्यांनी ५० हुन अधिक म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन केले आहे ज्यात हळू हळू चाल , सावली उन्हामध्ये , मस्त चाललंय आमचं, राधा राधा या सारख्या व्हिडिओज चा समावेश आहे) जो मानसी नाईक जी एक घरचीच कलाकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात “वाटेवरी मोगरा”मध्ये दिसणार आहे. मानसी नाईक चा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी १९ जानेवारीला मानसी ने प्रदीप खरेरा ( आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अभिनेता ) यांच्याशी लग्न केले आणि या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत.

निलेश मोहरीर चे सुमूधर संगीत, श्रीपाद जोशी यांचे सुंदर शब्द, वैशाली आणि स्वप्नीलचे अगदी वरच्या स्तरावरील गायन , सोबत सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेला ग्लॅमरस म्युझिक विडिओ आणि मानसी-प्रदीपचा रोमँटिक परफॉर्मन्स हि या म्युझिक व्हिडिओची खास वैशिष्ट्यं .

१२ मार्चला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर हे गाणे रिलीज होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: