अर्थसंकल्पात मातंग समाजावर अन्याय, राज्यभर आंदोलन करण्याचा हनुमंत साठे यांचा इशारा

पुणे दि 11- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद नाही,मातंग सामाज्याच्या बाबतीत शासनाची सापत्नीक वागणूक केल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन मातंग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे तीव्र निदर्शने करण्यात आली .यावेळी मातंग समाजाला योग्य न्याय देऊन लवकरात लवकर घोषणा करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशादयक्ष हनुमंत साठे यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र शासनाने नुकतेच अंदाजपत्रक जाहीर केले.अंदाजपत्रकामध्ये विविध सामाज्याच्या आर्थिक,सामाजिक विकासासाठी विविध महामंडळाच्या स्थापना करण्यात आल्या.नुकत्याच जाहीर झालेल्या अंदाजपत्रकामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ,मौलाना आझाद महामंडळ, महाज्योती महामंडळ,वसंतराव नाईक महामंडळ,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, शामराव पेजे कोकण महामंडळ,आदि महामंडळामध्ये आर्थिक तरतूद केली आहे, मात्र मातंग सामाज्याच्या सामाजिक आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी सहाय्यभुत ठरणाऱ्या लोकशाहीर आणा भाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळास राज्यसरकारने एक रुपयाची देखील तरतूद केली नाही.यावरून सरकार मातंग सामाज्याच्या बाबतीत सापत्नीक वागणूक देत आहे असा आरोप हनुमंत साठे यांनी केला आहे.

अण्णा भाऊ साठे महामंडळातील कथित भ्रष्टाचाराचा बहाणा करीत गेली आठ वर्षांपासून या महामंडळास भागभांडवल तरतूद नाही.तसेच लो.अण्णा भाऊ साठे स्मारक मुंबई, लो.अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रम आद्यकरां तीकारक लहुजी वस्ताद साळवे स्मारक संगमवाडी,पुणे या स्मारकासाठीही आर्थिक तरतूद केली नाही, लो.अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा विसर या सरकारला पडल्याचे दिसते , यावरून या सरकारची मातंग समाज आणि अण्णा भाऊ साठे यांच्याबध्दल सरकारमध्ये सापत्नीक वागणुक दिसून येते सरकारने मातंग सामाज्याच्या भावनांचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अण्णा भाऊ साठे महामंडळास ५०० कोटी रुपयाची तातडीची तरतूद करावी या मागण्यासाठी आज मातंग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली .आमच्या मागण्या आठ दिवसात मान्य झाल्या नाहीतर राज्यभर लढा उभारणार असल्याचा इशारा मातंग आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात प्रदेशादयक्ष हनुमंत साठे रिपब्लिकन युवक आघाडी शहराध्यक्ष शैलेश चव्हाण ,शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड ,मातंग आघाडी शहराध्यक्ष संदीप गायकवाड ,बाळासाहेब मस्के ,खंडू शिंदे ,लखन कांबळे ,विरेन साठे यासह महिला व युवक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: