फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त शिलाई मशीन, अन्नधान्य वाटप

पुणे: फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त औंध मिलिटरी स्टेशन येथील आर्मी वाईफ्स वेल्फेअर सेंटरला सहा शिलाई मशीन देण्यात आल्या. ‘कश्का’ या इंटरनॅशनल गारमेंट हाऊस आणि भारतीय कुटुंब नियोजन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महिलांना शिलाईकामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

प्रायोगिक तत्वावर येथे फिजिओथेरपी केंद्रही सुरु करण्यात आले आहे. सध्या १० मुलांना फिजिओथेरपीचे उपचार सुरू करण्यात आले आहे. मिलटरी स्टेशनमधील ८०० कुटुंबांना या केंद्राचा लाभ होणार आहे. लोअर केडर सैन्य अधिकाऱ्यांच्या पत्नीचे जीवनमान उंचावण्याचे काम या केंद्राद्वारे होते. यावेळी भारतीय कुटुंब नियोजन संघटनेच्या अध्यक्षा अवलोकिता माने, इंटरनॅशनल गारमेंट हाऊसचे संस्थापक विजय बजाज, संचेती हॉस्पिटल येथील बालअस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पटवर्धन उपस्थित होते.


तसेच महिला दिनाच्या निमित्ताने घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १२५ सफाई महिला कामगारांना व सहा पर्यवेक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना राशन, आरोग्य संच, ग्लोव्ज आणि सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले. प्रसंगी घोले रोड प्रभागी अध्यक्षा सोनाली लांडगे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका निवेदिता एकबोटे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, मुकुल माधव फाऊंडेशनचे प्रतिनिधी सचिन कुलकर्णी, बबलु मोकळे, यास्मिन शेख, फिनोलेक्सच्या सौम्या रुपेश, अंजली जायभाये, सुप्रिया मोरे, अक्षय कोकणे, निकिता कुलकर्णी आदी उपस्थित होते


अवलोकिता माने म्हणाल्या, “मुकुल माधव फाउंडेशनने यापूर्वी १८ शिलाई मशीन दिल्या होत्या. कोरोनाच्या काळात याचा फायदा खूप झाला. महिलांनी मास्क, कापडी पिशव्या शिवून आपली उपजीविका चालवली. फाउंडेशनकडून महिला सक्षमीकरणाचे होत असलेले कार्य समाजोपयोगी आहे. येथे उभारण्यात आलेल्या फिजिओथेरपी केंद्रामुळे येथील लोकांना चांगले उपचार मिळतील.” बजाज यांनीही फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
प्रा. ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, “कोरोनामुळे आपण पुन्हा एकदा घरी बसू शकत नाही. मात्र, योग्य ती काळजी घेऊन ‘न्यू नॉर्मल’ जीवन जगू शकतो. महिलांचे समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असते. या सफाई करणाऱ्या महिलांमुळे शहर स्वच्छ राहते. आज महिलादिनी त्यांचा सन्मान करताना कृतज्ञतेची भावना आहे. मुकुल माधव फाउंडेशनचे महिला सक्षमीकरणासाठीचे योगदान उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: