मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 9 : दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.

यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने सभागृहाला माहिती दिली. ते म्हणाले, या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविला आहे. केंद्र सरकारनेही तपास एनआयएकडे सोपविला आहे. याबाबत नि:पक्षपातीपणे चौकशी करुन जे कोणी यामध्ये दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: