आलिया भट्टच्या आयुष्यातील नवीन मंत्र आहे ‘टेक इट लाइट’

 कॅडबरी पर्क हा माँडेलीझ इंडियाच्या आयकॉनिक आणि फन ब्रॅण्ड्सपैकी एक आणखी एक विनोदी अभियान बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या साथीने सुरू करण्यास सज्ज आहे. युथ आयकॉन आलियाचा सहभाग असलेल्या एका प्रसन्न डिजिटल फिल्मच्या माध्यमातून कॅडबरी पर्क ग्राहकांना आयुष्यातील आव्हानांचा सामना हलकाफुलका दृष्टिकोन ठेवून करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ब्रॅण्डचा संदेश आहे ‘टेक इट लाइट’.

 माँडेलीझ इंडियाच्या मार्केटिंग (चॉकोलेट्स), इनसाइट्स आणि अॅनालिटिक्स विभागाचे वरिष्ठ संचालक अनिल विश्वनाथन म्हणाले,“कॅडबरी पर्क हा ब्रॅण्ड सुमारे २५ वर्षांपूर्वी आणला गेला आणि तेव्हापासून आपल्या मजेशीर व्यक्तित्वामुळे तसेच महत्त्वपूर्ण संदेशांमुळे तो तरुणाईच्या संस्कृतीत रुजलेला आहे. २०१५ पासून आम्ही ‘मस्ती’च्या संदेशाचा प्रसार केला. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि पर्कला एक फन ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित करण्यातही त्याची मदत झाली. यावेळी आम्हाला या उत्पादनात ब्रॅण्ड रुजवायचा होता आणि पर्क खाण्याचा अत्यंत हलकाफुलका अनुभव अधोरेखित करायचा होता. आयुष्यातील तणावांकडे हलक्याफुलक्या दृष्टिकोनातून बघण्यावर आजच्या तरुणाईचा विश्वास आहे. पर्क हे लाइट चॉकलेट आहे हा संदेश मजेशीर पद्धतीने आणि उंच उडण्याच्या मार्गाने देण्याचा प्रयत्न आम्ही लाँच फिल्म आणि टॅगलाइन ‘पर्क खाओ, लाइट हो जाओ’ यांच्या माध्यमातून केला आहे. यापूर्वीही आम्ही प्रीटी झिंटा, जेनेलिया डिसुझा, अनन्या पांडे यांसारख्या तरुणाईच्या विश्वाला आवडणाऱ्या उत्साही आणि चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्वांची निवड ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून केली आहे. कॅडबरी पर्कचे ज्यांचे प्रतीक आहे ती तरुणाई, मजा आणि आयुष्याचा आनंद लुटण्याची वृत्ती असलेले ब्रॅण्ड अँबॅसडर्स आम्ही घेतले आहेत. आता ब्रॅण्डचा चेहरा म्हणून आलिया भट्ट आल्यामुळे ती ‘टेक इट लाइट’ हे मूल्यविधान तिच्या बबली पर्सोनाच्या व तरुणाईशी असलेल्या घट्ट नात्याच्या माध्यमातून जिवंत करेल, अशी आशा आम्हाला वाटते.”

ब्रॅण्ड अँबॅसडर आलिया भट्ट म्हणाली, “माझ्या सर्वांत आवडत्या चॉकलेट ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या कॅडबरी पर्कसोबत परत काम करण्याचा अनुभव अत्यंत उत्साहपूर्ण आहे. हा ब्रॅण्ड मजेशीर आणि मस्तमौला प्रचारचा आहे. माझे स्वत:चे खेळकर व्यक्तिमत्त्व यात दिसते तसेच माझ्याही आयुष्याचा मंत्र ‘टेक इट लाइट!’ हाच आहे. फिल्म शूट करण्यापासून ते लाँचपूर्वी आम्ही केलेल्या चर्चांपर्यंतचा संपूर्ण अनुभव खूप मजेशीर होता.”

नवीन अभियानात उड गये या एका आकर्षक डिजिटल फिल्मचा समावेश आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि पवैल गुलाटी यांनी काम केले आहे. ही फिल्म विवाहमंडपाच्या प्रसन्न वातावरणात सुरू होते. या मंडपात आलिया आणि पवैल अर्थात नवरामुलगा जयमाला विधी करताना दिसतात. यात पवैलचे मित्र त्याला एक प्रथा म्हणून खांद्यांवर उंच उचलून घेतात. त्यामुळे आलियासाठी त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण होऊन जाते. आपल्या खेळकर व्यक्तिमत्त्वाला साजेशा पद्धतीने आलिया ते आव्हान स्वीकारते, ती लाइट व क्रंची कॅडबरी पर्कचा एक तुकडा घेते आणि स्वत:ला जमिनीपासून उंच उचलून त्याच्या गळ्यात हार घालते. ‘पर्क खाओ, लाइट हो जाओ’ हा संदेशही ती या कृतीतून सहजच देते.

ऑगिल्व्ही इंडियाचे चीफ क्रिएटिव ऑफिसर सुकेश नायक म्हणाले,“ही हलकेपणाची अत्यंत मजेशीर कल्पना आहे, ती प्रत्यक्षात आणणे खूपच सुंदर अनुभव होता. आलिया, पवैल आणि बॉब यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेशीर होता. या कल्पनेभवतीची सामाजिक धारणा आणि ही फिल्म दोन्ही मिळून ‘पर्क खाओ, लाइट हो जाओ’ ही संकल्पना अत्यंत सुंदर पद्धतीने जिवंत करतील.”

या डिजिटल फिल्मचा लाँच जिवंत करण्यासाठी आलिया भट्टच्या सोशल मीडियावरील प्रभावी सहयोगाच्या तसेच इन्फ्लुएन्सर इंगेजमेंटच्या माध्यमातून चर्चा घडवून आणत पार्श्वभूमी तयार करण्यात आली. त्यापाठोपाठ फिल्म पोस्टरचे अनावरण करण्यात आले आणि अखेरीस डिजिटल फिल्म लाँच करण्यात आली. 

Leave a Reply

%d bloggers like this: