राऊंड टेबल इंडिया – चॅप्टर १७७ तर्फे जि. प. प्राथमिक विद्यालय, मुखाई साठी ४ वर्गखोल्या

पुणे,दि. ४ – राउंड टेबल इंडिया ( आरटीआय) गेल्या अनेक वर्षांपासून वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणजे राउंड टेबल इंडिया चॅप्टर १७७ ने शिरूरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुखाई येथे अतिरिक्त ४ वर्ग कक्ष निर्माण केले आहेत. ४ क्लासरूम प्रोजेक्ट अंतर्गत बनविले गेलेले हे वर्गकक्ष नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमाअंतर्गत गावकर्यांना सुपूर्द करण्यात आले.

राउंड टेबल इंडिया ही गैर राजनैतिक व गैर सांप्रदायिक तरुण सदस्यांची संस्था आहे. सदस्यांचे उद्दीष्ट म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यात सेवा, फेलोशिप आणि सद्भावनांस प्रोत्साहन देणे.  ते म्हणतात की एक मूल, एक पुस्तक, एक पेन आणि एक शिक्षक जग बदलू शकतो. 

या प्रकल्पाचे उद्घाटन टी. आर. देवेश जटिया, गावाचे सरपंट पलांडे व आरटीआय चाप्टर १७७ चे सदस्य यांच्या हस्ते झाले. यावेळी आरटीआयच्या सदस्यांचा सन्मान करण्यासाठी गावकर्यांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. आरटीआय चाप्टर १७७ चे चेअरमन रिषु बावेजा यांनीं यावेळी आपले विचार माडण्याची विनंती केली गेली, यावेळी त्यांनी ही सुरुवात भावी पिढ्यांच्या शिक्षणामध्ये आणि विकासामध्ये कसा फरक आणू शकेल याबद्दल ग्रामस्थांच्या मार्गदर्शन केले.

शाळेलीत हे वर्ग कक्ष अतिशय सुंदर पद्धतीने बनविण्यात आले आहेत, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेस साठी प्रत्येक वर्ग हा सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे, विद्यार्थ्यांसाठी सीसीटीव्ही, दूरदर्शन, प्रोजेक्टर आणि वॉटर फिल्टर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

“राउंड टेबल इंडिया बर्‍याच दिवसांपासून वंचित मुलांसाठी शिक्षण देण्याचे काम करीत आहे. आरटीआय ने शिक्षणाचे उद्दीष्ट समोर ठेऊन कार्य सुरू केल्यांनंतर ‘सर्वांसाठी शिक्षण’ चे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक समाजहितकारी आरटीआयशी जोडले गेले. आपल्या देशाचे भविष्य विकसित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत करणे. ”

पुढे आणखी ४ वर्ग खोल्या बनवण्याचे फाउंडेशनचे नियोजन आहे, व लवकरच दुसरा टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: