‘कोविड-१९’मधून बऱ्या झालेल्या रुग्णावर  यकृत प्रत्यारोपणाची अपोलो हॉस्पिटल येथे यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे – महाराष्ट्रात कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, हे वर्ष मोठेच आव्हानात्मक ठरले. त्यातच, यकृताचा जुनाट आजार असलेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंत झाल्याच्या घटना देशभर पाहावयास मिळाल्या. मुंबई व नवी मुंबई विभागातील सर्वात प्रगत ‘मल्टी-स्पेशालिटी टेर्टियरी केअर हॉस्पिटल’अपोलो हॉस्पिटलमध्ये कोविड-१९’ साथीपासून बचावाकरीता घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खबरदारी घेत, यकृत प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने कोविड – १९ .या आजारातून बऱ्या झालेल्या चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या.

  या चारही रुग्णांना यकृताचा शेवटच्या टप्प्यातील आजार असल्याचे निदान झाले होते. तीन रुग्णांमध्ये प्रत्यारोपण झालेली यकृते ही हयात असलेल्या दात्यांकडून मिळविण्यात आली, तर एका रुग्णामध्ये प्रत्यारोपित झालेले  यकृत  हे एका मृत दात्याचे होते. यकृत प्रत्यारोपण  झालेल्या सर्व रुग्णाची प्रकृती आता उत्तम  असून त्यांना योग्य सल्ला देण्यात येत आहे .या रुग्णांपैकी एक ३७  वर्षीय पुरुष मागील ८ महिन्यांपासून यकृताच्या जुनाट आजाराने ग्रस्त होता. बिघडलेल्या यकृतामुळे त्याला वारंवार ‘एन्सेफॅलोपॅथी’, जलोदर आणि रक्ताच्या उलट्या यांचा त्रास होत होता. त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला.  

इथेनॉलशी संबंधित विघटनशील क्रोनिक यकृत रोगाने ग्रस्त असलेला आणखी एक 64 वर्षीय रुग्णदेखील सतत ताप आणि मायल्जियासह अपोलो हॉस्पिटल्समध्ये गेला. ‘आरटी-पीसीआर’द्वारा (रिअल-टाइम पॉलिमरेज चेन रिअॅक्शन) ‘सार्स-कोव्ह-२ ’साठी त्याची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली. ‘कोविड-१९ ’पासून बरा झाल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला तयार करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे, जिवंत-संबंधित दाता यकृत प्रत्यारोपणासाठी अयोग्य दाता मिळण्यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या घटना उद्भवल्या.  याचप्रमाणे इतर केसेसमध्येही यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. 

यकृत प्रत्यारोपण करण्यात आलेली १९  वर्षांची मुलगी तन्वी पाळंदे म्हणाली  “माझी खालावलेली प्रकृती, कोरोनाची साथ आणि टाळेबंदी या सर्व गोष्टींमुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली होती.   माझ्या कुटुंबास कोविड-१९ चा संसर्ग झाल्याचे निदान झाले. माझ्या कोविड चाचणीचा निष्कर्षदेखील पॉझिटिव्ह आल्याचे मला समजले, त्यावेळी माझ्या मनात भीती निर्माण झाली.   डॉक्टरांनी मला खूप पाठिंबा दर्शविला आणि आमचे समुपदेशन केले. त्यातून आम्हाला यकृत प्रत्यारोपण करून घेण्याचा आत्मविश्वास आला. मला वाचविण्याकरीता माझ्या आईने तिच्या यकृताचा एक भाग मला दान केला, मला सर्व प्रकारची मदत करून एक नवीन आयुष्य मिळवून दिल्याबद्दल डॉक्टरांची  मी आभारी आहे.”

अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईच्या एचपीबी अँड लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. विक्रम राऊत म्हणाले  “यकृताची गंभीर स्थिती असलेल्या चार रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक होते. आमच्याकडे आलेल्या या केसेस अतिशय गुंतागुंतीच्या होत्या. त्यातच या रुग्णांना ‘कोविड-१९ ’ची लागण झालेली होती;  “यकृताचे कार्य पूर्णपणे मंदावल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता, कोविडमुळे मृत्यू पावण्याच्या तुलनेत, ३०  ते ५०  टक्के इतकी असते.  

 तथापि, ‘कोविड-१९ ’च्या अनिवार्य खबरदारीचे पालन करून आणि कोविडच्या चाचण्यांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त करून आम्ही सर्व रूग्णांवर यकृताचे प्रत्यारोपण केले. या रूग्णांपैकी एकाला ‘कोविड- १९ पासून बरे झाल्यानंतर मृत व्यक्तीकडून अवयवदान घ्यावे लागले. अशा प्रकारे पश्चिम भारतातील कोविडपश्चात ‘डीडीएलटी’ची (डीसीज्ड डोनर लिव्हर ट्रान्सप्लॅंट) ही पहिली केस ठरली. रुग्णाला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून शस्त्रक्रियेदरम्यान व नंतरही त्याची अति काळजी घेण्यात आली. तसेच, रक्त उत्पादने, औषधे, अन्य वस्तूंचा पुरवठा व पायाभूत सुविधा यांची पुरेशी उपलब्धता असेल, याची खबरदारी घेण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरचे जंतूसंसर्ग प्रतिबंधक उपायांचा कठोरपणे अवलंब करून आणि विलगीकरणाचे प्रोटोकॉल व ‘इम्युनोसप्रेशन’चे न्याय्य व्यवस्थापन केले     

Leave a Reply

%d bloggers like this: