नरेंद्र मोदींचा हिंदू नर्सेसवर विश्वास नाही, ख्रिश्चन नर्सकडून लस टोचून घेतली; प्रकाश आंबेडकरांची टीका

मुंबई, दि. 1 – देशभरात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लसीकरण करून घेतलं. मात्र, लसीकरणावेळी मोदींनी मास्क परिधान न केल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसेंदिवस हिंदू निष्ठेचा ढोल बडवत असतात. पण त्यांचा हिंदू नर्सेसवर विश्वास नाही. त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून कोरोना लस टोचून घेतली. काय वर्तन आहे”, असं ट्वीट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या ट्वीटमुळे आता जोरदार राजकारण रंगलं आहे. सोशल मीडियातही आंबेडकरांच्या ट्वीटवर मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लस टोचली तेव्हा त्यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमचा घातला होता. हा गमचा म्हणजे आसाममधील महिलांच्या आशीर्वादाचे प्रतिक मानला जातो. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचण्यात आली त्यांचीही बरीच चर्चा सुरु आहे. यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. या नर्सेसनी मोदींना लस टोचून काहीवेळ त्यांच्यावर देखरेख ठेवली.

Leave a Reply

%d bloggers like this: