मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने साहित्यिक आपल्या भेटीला

पुणे : एम सी ई सोसायटीचे ज्युनियर काॅलेज ऑफ एज्युकेशन आझम कॅम्पस , पुणे यांच्या वतीने
मराठी भाषा गौरव दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा. डॉ राजेंद्र ठाकरे ( रयत शिक्षण संस्था हडपसर , पुणे ) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. अतिशय साध्या सोप्या भाषेत मराठी साहित्य त्यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते . विभागप्रमुख रिजवाना दौलताबाद यांनी केले . प्रा.शब्बीर फुलारी यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.अमिता डंबीर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले

Leave a Reply

%d bloggers like this: