आयसीएआयचा संघ क्रेडाई क्रिकेट प्रिमीयर लीगचा विजेता

पुणे, दि. २७ – इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात आयसीएआय चा क्रिकेट संघ यावर्षी क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई क्रिकेट प्रिमीयर लीग (CCPL)चा विजेता संघ ठरला. गुरुवारी पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या क्रिकेट सामन्यात आयसीएआयच्या संघाने हे जेतेपद पटकाविले.

क्रेडाई पुणे मेट्रो (सीआरपीएम), इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (आयएसएसई), आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स सर्व्हेयर्स असोसिएशन (एईएसए), इंडियन इंस्टीट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए), इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएआय) आणि प्रॉपर्टी रिअल्टर्स ऑफ पुणे (पीआरओपी) या संस्थांच्या संघांनी क्रेडाई क्रिकेट प्रिमीयर लीगच्या या एक दिवसीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.              

आयसीएआय आणि आयआयए या दोन संघात या वेळी अंतिम सामना पार पडला. ज्यामध्ये आयसीएआयच्या संघाने ६ षटकांमध्ये ७४/३ इतकी धावसंख्या गाठली. यावेळी फलंदाज साहिल पारखने ९ चेंडूत ६ चौकार मारत २८८.८९ स्ट्राईक रेटने २६ धावा केल्या. यानंतर आयईएआयच्या गोलंदाजांनी आयआयएच्या संघाला ६ षटकांमध्ये ४९/५ धावसंख्येवर रोखत २६ धावांनी सामना जिंकला.

या वेळी आयसीएआयच्या साहिल पारखने सामानावीर, आयआयएच्या सुशील जाधवने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत मालिकावीराचा किताब जिंकला. अमित बलदोटा (आयसीएआय) यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज तर आनंद  दायमा (आयसीएआय) यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.        

मालिकेचे उद्घाटन क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयर्नमॅन डॉ. कौस्तुभ राडकर यांच्या उपस्थितीत पार पडले. विजेत्यांना क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष मनीष जैन, सचिव आदित्य जावडेकर आणि क्रेडाई क्रिकेट प्रिमीयर लीगचे समन्वयक केतन रुईकर आणि पुनीत ओसवाल यांच्या हस्ते करंडक देत गौरविण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: