Saturday, May 30, 2026
PUNE

कलाकारांनी मनातील भावना सर्वप्रथम स्वत: जगायला हवी अभिनेते सयाजी शिंदे यांचे मत

पुणे : कलाकार कलेतून काहितरी सांगण्याचा प्रयत्त्न करतात, जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मनातील भावना कलाकारांनी सर्वप्रथम स्वत: जगायला पाहिजे. कवी, कादंबरीकार दुसºयांना कसे जगावे हे सांगतात, परंतु कलाकारांनी स्वत: जगून मग दुसºयांना तसे जगायला सांगायला हवे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. 

स्टारविन्स ग्रुप यांच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे स्टारविन्स आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टारविन्स ग्रुपचे प्रणव तावरे, स्वरदा देवधर, प्रथमेश खारगे, राज लोखंडे, मिहीका अजिथ आदी उपस्थित होते. 
सयाजी शिंदे म्हणाले, अन्न आणि हवा आपल्याला झाडांपासूनच मिळते. आपण झाडांपासूनच आहोत. परंतु आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही. घरातील सामान,दागिने, गाड्या घेताना ब्रँन्ड चा विचार करतो. परंतु जगण्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या हवा, पाणी, निसर्ग याकडे लक्ष देत नाही. शक्य तितके निसर्गाच्या जवळ जायला हवे, असेही त्यांनी सांगितले. 
फेस्टिवलमध्ये देशभरातून विविध छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे तसेच रेखाटलेली  पेंटिंग्स रसिकांना पहायला मिळाली. प्रदर्शनाचे यंदा ५ वे वर्ष होते. दरवर्षी क्षण छायाचित्र प्रदर्शन,पॅलेट चित्र प्रदर्शन आणि कलाधिपती छायाचित्र प्रदर्शन भरविले जाते. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच असे आर्ट फेस्टिवल पार पडले. सन २०२० या वर्षांत कोरोनामुळे प्रदर्शनाचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे एकत्रित प्रदर्शनांचे आर्ट फेस्टिव्हल भरविण्यात आले. फेस्टिवलच्या माध्यमातून  ग्रुपने नेहमीच नवोदित छायाचित्रकर आणि चित्रकारांना संधी दिली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading