Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

बुध्दीमत्तेला पैलू पाडणारे उपक्रम हवेत – वर्षा गायकवाड

राज्यस्तरीय  अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचे मंत्रालयात पारितोषिक वितरण  

पुणे, दि. २६ – लहान विद्यार्थी हे उद्याचे लखलखणारे हिरे आहेत, त्यांना पैलू पाडण्यासाठी अंकनाद पाढे स्पर्धेसारखे उपक्रम उपयोगी ठरतील, अशा स्पर्धांमधील गुणवंतांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी शासन मदत करेल. त्यासाठी झूम मीटिंग द्वारे लवकरच बैठक आयोजित केली जाईल ‘, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

शालेय अभ्यासक्रमात , तसेच परिपाठात पावकी, निमकी, अडीचकी, एकोत्रे या पारंपारिक पाढयांचा समावेश करण्याच्या मागणीवर विचार करू, असे आश्वासनही वर्षा गायकवाड यांनी दिले.

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा लि आणि राज्य मराठी  विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात  आलेल्या  राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मंत्रालयात मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, विशेष कार्य अधिकारी चित्रा देशपांडे यांच्या हस्ते  झाले.

त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट विजेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली. अंकनाद ‘ च्या उपक्रमाचे आणि विजेत्यांचे त्यांनी कौतुक केले.

७ गटातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.प्रत्येक गटात प्रथम क्रमांकांना रुपये ११ हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे ही  पारितोषिके म्हणून दिली गेली.

मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी  विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला होता..

 मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी , पराग गाडगीळ, निर्मिती नामजोशी, समीर बापट उपस्थित होते.

.जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून १७६० स्पर्धक सहभागी झाले होते
 

   मंदार नामजोशी म्हणाले,’ अंक नाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल,हा उद्देश होता. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले होते . जिल्हा पातळी,  राज्य पातळीवर स्पर्धा घेतली . ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली . सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे पाठांतर स्पर्धा खुली होती. पुढील पाच वर्षे ही स्पर्धा राज्य पातळीवर घेतली जाईल, असे मंदार नामजोशी यांनी जाहीर केले. पराग गाडगीळ यांनी आभार मानले.                                                            

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading