निसर्गाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य – अंकित गोयल 

पुणे, दि. २४ – निसर्गाने आपल्याला निरोगी राहण्यासाठी सर्व काही दिले आहे. म्हणून त्याचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. पर्यावरण आणि समाजाबद्दलीची आपली जवाबदारी आपण पूर्णपणे समजून घ्यायला हवी. त्यासाठीच आम्ही केवळ झाडे लावून त्यांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जवाबदारी घेतो. असे मत गोयल गंगा डेव्हलपमेंटचे संचालक अंकित गोयल यांने मांडले.

 शहरातील रिअल इस्टेट डेव्हलपर गोयल गंगा डेव्हलपमेंट्सने वाघोली येथील गंगा हिलशायर या प्रकल्पामध्ये वृक्षारोपण मोहीम राबविली. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाच्या वेळी ग्रूपचे संपूर्ण व्यवस्थापन पथक आणि गंगा हिलशायर फेज १ मधील रहिवासियांनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या अभियानात रहिवासीयांनी जोरदार सहभाग घेऊन ५० हून अधिक झाडे लावले. या ग्रूपने केवळ वृक्ष लावण्याचीच नव्हे तर त्यांची काळजी घेण्याचीही जवाबदारी स्वीकारली आहे. 

अंकित गोयल म्हणाले, एक जवाबदार विकसकाप्रमाणे आम्ही सर्व प्रकल्पांमधील ग्राहकांना योग्य वातावरण तयार करून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच प्रकल्पातील मोकळ्या जागेला अधिक महत्व देतो. या अनुक्रमे, गोयल गंगा डेव्हलमेंट्सने केवळ रोप लावण्याचे वचन दिले नाही तर त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. यावेळी लहान मुलांनीही रोप लावण्यास कोणतीही कसर सोडली नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: