Wednesday, June 17, 2026
PUNETOP NEWS

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: पुणे जिल्ह्याला पुरस्कार

पुणे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी साठी जिल्ह्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे जिल्ह्यास भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये उल्लेखनीय कामकाजा करिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ५.३०,२३५ एवढी आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत ५०० कोटी ५४ लाख १४ हजार एवढा निधी पोर्टल द्वारे जमा करण्यात आलेला आहे भौतिक तपासणी साठी २०,०१३ एवढ्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती त्याचे कामकाज १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. योजनेतील १ लक्ष ७९ हजार एवढ्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच लाभार्थ्यांच्या बँकेचा चुकीचा तपशील ४८,२९५ इतका दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच तक्रार निवारणासाठी १,२३५ एवढ्या तक्रारी प्राप्त होत्या त्याचे १०० टक्के निराकरण करण्यात आले आहे. आयकर भरणारे व इतर कारणामुळे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांकडून ५.८०.५८,००० इतक्या रकमेचे वसूली करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा कामकाज करतांना सर्व तालुकास्तरीय यंत्रणेचा दैनंदिन आढावा व्ही. सी द्वारे व बैठकी द्वारे घेण्यात आला. तसेच दैनंदिन कामकाजानुसार तालुक्यांचे अनुक्रम ठरविण्यात आले व त्यानुसार आढावा घेण्यात आला. कोरोना सारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत तालुका स्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी योजनेचे कामकाज ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार पूर्ण केले आहे.
जिल्हधिकारी कार्यालयातील गृह विभागातील प्रधानमंत्री योजनेचे कामकाज पाहणारे पथक, राष्ट्रीय सूचना केंद्रातील वैज्ञानिक, सर्व तहसीलदार व त्यांचे पथक तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व मार्गदर्शनामुळे सर्व पथकांनी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे. पी.एम.किसान योजनेंतर्गत (लाभार्थी तक्रार निवारण) Grievance Redressal या बाबीखाली पुणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळविण्यात आलेले आहे.


हा पुरस्कार वितरण समारंभ केंद्रीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ रोजी दु. १२ वा. अ.पी. शिंदे सभागृह, एन.ए.एस.सी. कॉम्प्लेक्स, पुसा, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्हधिकारी कार्यालयातील गृह विभागातील प्रधानमंत्री योजनेचे कामकाज पाहणारे पथक, राष्ट्रीय सूचना केंद्रातील वैज्ञानिक, सर्व तहसीलदार व त्यांचे पथक तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व मार्गदर्शनामुळे सर्व पथकांनी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे हे उपस्थित राहणार आहेत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading