डॉ. रमण गंगाखेडकर यांना ‘एआयटी’तर्फे जीवनगौरव पुरस्कार

पुणे: आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी (एआयटी) पुणेच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांना, तर यशस्वी उद्योजक पुरस्कार ‘एम तत्व’ आणि सिम्बो.एआय’ कंपनीचे सहसंस्थापक बलजीत सिंग आणि सहसंस्थापक प्रवीण प्रकाश यांना जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते गुरुवार,  दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता, दिघी येथील एआयटीच्या कॅम्पस मध्ये या पुरस्कारांचे वितरण होईल.  
डॉ. रमण गंगाखेडकर भारतीय साथरोग विशेषज्ञ आहेत. सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत (आयसीएमआर) महामारी आणि संसर्गजन्य रोगांचे मुख्य वैज्ञानिक म्हणून काम पहिले. २०२० च्या पद्मश्री पुरस्काराचे ते मानकरी आहेत. कोरोनाच्या काळात ‘आयसीएमआर’तर्फे वेळोवेळी माध्यमांना माहिती देण्याचे काम त्यांनी केले. एम तत्व ही कंपनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य क्षेत्रात काम करते, अशी माहिती ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट यांनी दिली. 

Leave a Reply

%d bloggers like this: