सैनिकांच्या वीरपत्नी व वीरमातांंना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत

पुणे : स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केले त्यामुळे आपण आज आहोत. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर रात्रं-दिवस देशाच्या व एकप्रकारे आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी जे करतात त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याच्या भावनेने शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठानतर्फे भारतीय सैन्यदलातील जवानांच्या पाच वीरपत्नी व वीरमातांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 

शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथील येसाजी कामठे कुस्ती संकुल येथे आर्थिक मदत प्रदान व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेताजी कामठे, रवींद्र कामठे, हरिभाऊ कामठे, आबा कामठे (इगतपुरी), प्रतिष्ठानचे विश्वस्त विश्वजित कामठे, डॉ. कुणाल कामठे, विनायक कामठे, दीपक कामठे, गोरख कामठे, महेंद्र कामठे, विजय कामठे, गौरव कामठे, जीवन कामठे, शिवानाना कामठे, गणेश कामठे (म्हाळुंगे), नितीन कामठे, उमेश कामठे, महिला विभागाच्या डॉ. शर्मिला कुणाल कामठे आदी उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.  

वीरमाता लता नायर, वीरपत्नी दिपाली मोरे, कुसुम जाधव, मालुताई पाटील, सोनाली फराटे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रत्येकी रुपये १०,०००/-चा धनादेश, शाल, श्रीफळ व तुळशीचे रोप असे सन्मानाचे स्वरुप होते. सुनील कामठे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कामठे यांनी आभार मानल

Leave a Reply

%d bloggers like this: