‘आझम कॅम्पस’ च्या वतीने कँटोन्मेंट बोर्ड येथे शिवाजी महाराजांना अभिवादन

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस )च्या वतीने अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, संस्थेचे सचिव डॉ लतिफ मगदूम  यांच्या हस्ते  पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीसंस्थेचे पदाधिकारी, ‘अवामी महाज ‘ सामाजिक संस्थेचे पदाधिकारी,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट,महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट चे विश्वस्त उपस्थित होते.

 दरवर्षी काढण्यात येणारी  शिवजयंती अभिवादन मिरवणूक  यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती.

 गेली १६ वर्षे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस ) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रेषित महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. संस्थेच्या सर्व शैक्षणिक आस्थापनातील १० हजार  विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी होतात आणि महामानवाचे मानवतेचे संदेशांचा प्रसार करतात.                                                                                           

Leave a Reply

%d bloggers like this: