पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जयंतीनिमित्त स्मृती विशेषांकाचे प्रकाशन

पुरंदर, दि. 16 –   ग्राम गौरव प्रतिष्ठान (पाणी पंचायत), पर्यावरण समृद्धी मंच आणि साउथ एशियन पीपल्स अॅक्शन ऑन क्लायमेट क्राइसेस, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी पंचायत’चे शेतकरी प्रशिक्षण केंद्र, खळद, ता. पुरंदर, जि. पुणे येथे निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ‘पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया स्मृती विशेषांका’चे प्रकाशन ‘पाणी पंचायत’च्या अध्यक्षा कल्पनाताई साळुंखे व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूजलतज्ञ व ‘अॅक्वाडॅम’चे संस्थापक हिमांशू कुलकर्णी यांच्या शुभहस्ते आणि ‘साउथ एशियन पीपल्स अॅक्शन ऑन क्लायमेट क्राइसेस’चे संस्थापक सागर धरा, जेष्ठ जलसिंचन अभ्यासक प्रदीप पुरंदरे, शेती प्रश्नाचे अभ्यासक पांडुरंग शितोळे, वनराईचे सचिव अमित वाडेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

याप्रसंगी पांडुरंग शितोळे म्हणाले की, ‘‘पाणी, शेती, निसर्ग आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काहीतरी काम आपण केले पाहिजे, कार्यकर्ते म्हणून आपण यात उतरलं पाहिजे असं ज्यांच्यामुळे आम्हाला वाटलं आणि ज्यांच्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये आलो त्यामध्ये आम्ही पाहिलं नाव अर्थातच मोहन धारिया यांचं घेतो. यामध्ये दुसरं नाव विलासराव साळुंखे यांचं तर तिसरं नाव अण्णा हजारे यांचं आहे. या तिघांनी त्या काळामध्ये जी चळवळ सुरू केली होती त्यामध्ये पाणी बचत, जलसंधारण, वनीकरण आणि ग्राम विकास याबाबतची लोकचळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. त्यांच्या प्रेरणेतून आमच्यासारखे काही कार्यकर्ते तयार झाले. आजही या क्षेत्रात आम्ही आमच्या परीने आम्ही योगदान देत आहोत.’’ 

‘वनराई’ मासिकाचे कार्यकारी संपादक अमित वाडेकर यांनी अंक निर्मितीमागील भूमिका मांडताना सांगितले की, दरवर्षी दि.१४ फेब्रुवारी रोजी अण्णांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आणि राष्ट्राप्रतीच्या त्यांच्या बहुमोल योगदानाला समर्पित फेब्रुवारी महिन्याचा स्मृती विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. गेल्या सात वर्षांतील फेब्रुवारीच्या अंकांमध्ये देशामधील विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांनी सार्वजनिक हिताकरिता अण्णांचे लाभलेले मार्गदर्शन, सहकार्य आणि योगदान याबाबत आपापले अनुभव लेखाच्या, मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: