Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – आज दिवसभरात ४ हजार ७८७ नवीन रुग्ण, ४० जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे असं वाटत असतानाचा पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ होताना दिसतेय. आज दिवसभरात ४ हजार ७८७ नव्या रुग्णांची भर पडली असून ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ८५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय. सर्व निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे संसर्ग अधिक वेगाने वाढतो आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३८ हजार १३ असून, आजपर्यंत कोरोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.६२ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आजपर्यंत १५,४३,५५,२६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २० लाख ७६ हजार ९३ नमूने (१३.४३टक्के)पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ जण गृह विलगीकरणात असुन, १ हजार ६६४ जण संस्थात्कम विलगीकरणात आहेत.

राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केले. निर्बंध शिथिल करताना लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading