पुण्यात दिवसभरात 428 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

पुणे – शहरात बुधवारी दिवसभरात 428 नवे रुग्ण सापडले. तर 262 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संथ गतीने रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

आज करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 145 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 290 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 95 हजार 924 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1881 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4806 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: