नंदकुमार कदम, अशोक भागवत यांना परीट सेवा मंडळाचा समाजभूषण पुरस्कार प्रदान

पुणे : क्षत्रिय मराठा परीट सेवा मंडळ व परीट सेवा मंडळ, पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे परीट समाजभूषण व अष्टपैलू पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा समाजभूषण पुरस्कार नंदकुमार कदम, अशोक भागवत यांना तर अष्टपैलू पुरस्कार कृष्णा खंडाळे व सुधाकर यादव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कसबा पेठेतील संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन वास्तूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वास्तू उभारणीसाठी योगदान देणाºया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला.

यावेळी पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, उद्योजक रमाकांत कदम, दिव्यांग कल्याणकारी विभाग महाराष्ट्र सरकारचे उपायुक्त संजय कदम, परीट सेवा मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार व कवयित्री अमृता खाकुर्डीकर, क्षत्रिय मराठा परीट तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्कारचे स्वरूप होते. तसेच यावेळी वधू-वर परिचय विशेषांक २०२१ चे प्रकाशन करण्यात आले. 

कार्यक्रमात संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी योगदान देणारे सुरेश नाशिककर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत शिंदे,  नाना आदमाने, शिवाजी पवार, बबन पवार, बाबासाहेब जाधव, बाळासाहेब भोसले, छाया ठाणेकर, पुष्पा भोसले यांचा सन्मान करण्यात आला. कै. मोहन जाधव यांचा सन्मान हेमा जाधव यांनी स्विकारला तर कै. सुर्यकांत शिंदे यांचा सन्मान समिर शिंदे यांनी स्विकारला. 
संजय कदम म्हणाले, दैनंदिन काम करून समाज उभारणीसाठी चांगले काम करणाºया ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या ज्येष्ठ व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा घेवून तरुणांनी देखील समाजकार्यात सहभाग घ्यायला पाहिजे. समाजकार्यासाठी पुढे येणाºया तरुणांना योग्य मार्गदर्शन ज्येष्ठ व्यक्तींनी केले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. नंदकुमार राऊत यांनी सूत्रसंचालन केले, दत्तात्रय फंड यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ राऊत यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: