टाटा स्काय सादर करत आहे मराठी नाटक डिअर आजो

पुणे –  मराठी रंगभूमीने आपल्या नितांत सुंदर अशा, आयुष्यातील जमेची बाजू दाखवणाऱ्या कथांनी मध्यवर्ती स्थान मिळवलं आहे. पण आता तुम्ही नाट्यगृहात जाऊन नाटकं पाहणं मिस करत असाल तर आता एक अनोखी सोय अगदी तुमच्या  घरात उपलब्ध झाली आहे. टाटा स्काय थिएटरतर्फे झी थिएटरच्या सहकार्याने प्रसिद्ध मराठी नाटक डीअर आजोचं  प्रसारण  २१ फेब्रुवारी रोजी दुपारी  १२  आणि सायंकाळी ७ वाजता टाटा स्काय सादर  वर करण्यात येत आहे.

 ख्यातनाम अजित भुरे यांचं दिग्दर्शन असलेल्या या नाटकात  अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने मुख्य भूमिकेत आहेत. या अनुभवाबद्दल अभिनेत्री-लेखिका मयुरी देशमुख म्हणाली  टीव्हीवर नाटक दाखवल्याने मराठी नाट्यभूमी हळूहळू जागतिक अस्तित्व निर्माण करण्याकडे वाटचाल करत आहे. मराठी नाटकांच्या चाहत्यांची संख्या दरवर्षी वाढताना दिसतेय आणि नाटक टीव्हीवर दाखवणं हे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे डिअर आजो हे समकालीन नाटक आहे. यात भारतीय आजोबा आणि अमेरिकेतील त्यांची नात यांचं नातं मांडलं गेलंय. या नातीला काही काळ तिच्या आजोबांसोबत रहावं लागतं. अमेरिकेत असताना स्वतंत्र, आधुनिक पद्धतीचं जीवन ती जगली आहे. त्यामुळे इथे सतत फार काळजी घेणारे, कुरकरू करणारे आजोबा असल्याने तिला बांधल्यासारखं वाटू लागतं. मात्र, एक अवघड प्रवास वाटणारं हे नातं अल्पावधीतच एका सुंदर वळणावर येतं आणि आपल्यातील फरकांना दूर सारत ते एक दृढ बंध निर्माण करतात. अगदी लग्न करून आजोबांना एकटं सोडण्यास नात नकार देते. लग्नासंदर्भातील तिच्या अटीही त्यांच्यासाठी नव्या समस्या निर्माण करतात.  

Leave a Reply

%d bloggers like this: