पूजा चव्हाणची आत्महत्या; धनंजय मुंडेंचा दावा

मुंबई , दि. 15 – टिक टॉक स्टार पूजा चव्हाणची हत्या नाही, तर तिने जीव दिलेला आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी त्यावर आता बोलणं योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईलच. या प्रकरणातील सर्व काही बाहेर आल्यानंतर अधिक बोलता येईल, असं विधान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणावर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधी पक्षाने राज्यातील ठाकरे सरकारवर या प्रकरणावरुन चांगलच लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल आठ दिवसानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे. वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, असं अनिल देशमुख म्हणाले. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: