PMP -शिवजयंती पासून औंधगाव ते सिंहगड धावणार बस

पुणे, दि. १५ – पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएल कडून औंधगाव, बाणेर, सकाळ नगर, पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रोड या परिसरातील प्रवासी व पर्यटक यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मार्ग क्रमांक ५० क औंधगांव ते सिंहगड पायथा असा नवीन बसमार्ग शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी २०२१ पासून सूरु करण्यात येत आहे. इथून पुढे हा नवीन बसमार्ग दर गुरुवारी फक्त सकाळपाळीत सुरू राहणार आहे.

या बसचा मार्ग औंधगांव- बाणेर फाटा- सकाळनगर- विद्यापीठ गेट- सेनापती बापट रोड- कर्वे रोड- उत्तमनगर- एनडीए गेट- खडकवासला- सिंहगड पायथा असा आहे. या नवीन बस मार्गावरती प्रवाशी व पर्यटकांच्या सोयीसाठी न. ता. वाडी आगारातील मिडी बस संचलनात असणार आहे.
तरी या बससेवेचा लाभ औंधगांव परिसरातील व या बसमार्गावरील सर्व नागरिकांनी व पर्यटकांनी घ्यावा.असे आवाहन पीएमपी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बस मार्ग क्रमांक ५० क औंधगांव ते सिंहगड पायथा (मिडी बस)
(दर गुरुवारी फक्त सकाळपाळीत)
मार्ग क्रमांक ५० क (वेळापत्रक खालीलप्रमाणे)
औंधगांव मनपा भवन सिंहगड पायथा
– ४:१५ – ४:४५ – ५:५० ७:१० – ८:३० १०:१५ ११:५० –

Leave a Reply

%d bloggers like this: