कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमच्या वतीने ९६ देशी वृक्षांचे रोपण…   

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

पुणे : थोर स्वातंत्र्यसेनानी, तत्त्वनिष्ठ राजकीय नेते आणि ‘वनराई’ संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांचा १४ फेब्रुवारी हा जन्मदिवस. जल आणि वन याविषयी असणारी त्यांची विशेष आस्था लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमी संस्था-संघटना यांच्यातर्फे हा दिवस ‘जल-वन-मोहन दिन’ म्हणून साजरा केला जातो. कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमच्या वतीने ९६ देशी वृक्षांची लागवड करुन हि जयंती साजरी केली.

कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमच्या पुढाकाराने तसेच वनराई, पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा हा उपक्रम मार्केटयार्ड – कोंढवा रोड या मार्गावरील गंगाधाम चौक ते श्रीजी लॉन्स या दरम्यान रस्त्याचा दुतर्फा राबवला गेला. यावेळी वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सरदार पाटील, कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमचे अतुल जैन, सचिन गांधी, धवल सोनी, सम्यक ललवानी, महेंद्र गोयल, सनद जैन, सचिन राठोड, ज्योती पाटील, आनंद अग्रवाल, प्रवीण पटेल, चेतन चोरडिया, शैलेश छाजेड, रामभाऊ तोडकरी, माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका मानसी देशपांडे, सुनिल कामठे, संगीता ठोसर, सागर धारिया, राकेश शेलार आदी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक सरदार पाटील म्हणाले की, कोंढवा पोलीस स्टेशनच्यावतीने अनेक सामाजिक काम करण्यात येत आहे. कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमचा हा निसर्गप्रेमाचा उत्साह पाहून आनंद झाला. जरी झाडे यांच्या वतीने लावली असली तरी त्याचे संरक्षक करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासन विभाग चांगल्यारितीने पार पाडेल अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.  

अतुल जैन म्हणाले की, निसर्गावर प्रेम करा, निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल असे पद्मविभूषण स्व. डॉ. मोहन धारिया नेहमी म्हणायचे. त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच निसर्ग आणि पर्यावरणाची गोडी लावली. कोंढवा आणि परिसर आता विकसित होत आहे, मात्र निसर्ग जपला गेला पाहिजे यादृष्टीने कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमच्यावतीने आम्ही आण्णांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ९६ देशी झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावली. 

Leave a Reply

%d bloggers like this: