जलशक्ती मंत्रालय मान्यता प्राप्त जनजल डब्लुओडब्लु ला बजाज ऑटो कडून समर्थन

पुणे – जनजल डब्लुओडब्लु (वॉटर ऑन व्हील्स), आयओटी – आधारित प्रोप्रायोट्री टेक्नॉलॉजी सोल्यूशन असलेले थ्री – व्हीलर वाहन आहे, जे नोएडा स्थित जनजलने घरांच्या दारात सुरक्षित पेयजल पोहोचविण्यासाठी विकसित केले आहे. जल शक्ति मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल जीवन अभियानांतर्गत ५० अब्ज पेयजल योजनांना वितरीत करण्यासाठीच्या पाच तंत्रज्ञानापैकी एक म्हणून याला मंजूरी दिली गेली आहे. सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या संबंधित क्षेत्रांसाठी जनजल डब्लुओडब्लु द्वारे “हर घर जल” लक्ष्‍यांची गती वाढविण्यात सुचविले गेले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये नुकतेच जाहीर केले आहे की जल जीवन मिशन (शहरी) द्वारे पुढील ५ वर्षात नळ कनेक्शन द्वारे २.८७ कोटी कुटुंबांना सुरक्षित पाणी पोहोचवण्यात येईल. याद्वारे प्रत्येक घरात सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

जनजलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग अग्रवाल म्हणाले, “जलशक्ती मंत्रालयाने जनजल डब्लुओडब्लु (वॉटर ऑन व्हील्स) ला प्रत्यक्ष स्तरावरील समाधन या उद्येश्याने सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी मान्यता दिली आहे, याचा आम्हाला आनंद आणि सन्मान वाटतो. जल जीवन मिशनचा एक भाग म्हणून हे अद्वितीय नावीन्य आहे, जे घराच्या दारापर्यंत आणि शेवटच्या मीटरपर्यंत सुरक्षित पाणी वितरणासाठी अत्यधिक गतिशीलता प्रदान करते. बजाज ऑटो या तीन चाकी वाहनाने सर्वसमावेशक पणे कार्य करून सर्वांसाठी सुरक्षित पाण्याचे आमचे लक्ष्य आणि मिशनसाठी संपूर्ण सहकार्य केले आहे. पुढील काही वर्षांत भारतात हजारो जनजल डब्ल्यूडब्ल्यू आणू असा आमचा विश्वास आहे. ”

ते पुढे म्हणाले: “जनजल डब्लुओडब्लु एक पूर्णपणे टेक-मॅनेज्ड, जीपीएस-मॉनिटरींग, बॅटरी-चालित, शून्य कार्बन उत्सर्जनासह सुरक्षित तीन चाकी वाहन आहे.२०२४ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट असलेल्या भारत सरकारच्या ‘हर घर जल’ मोहिमे मध्ये आम्ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यास उत्सुक आहोत.

बजाज एंट्रासीटी बिजनेस अध्यक्ष समरदीप सुबंध म्हणाले, “बजाज ऑटो जनजल डब्लुओडब्लु उपक्रमास पाठिंबा देण्यास उत्सुक आहे, जे देशाच्या उभारणीस अनुरुप आहे , आणि कंपनीच्या ७५ वर्षांच्या योगदानाच्या अनुषंगाने आहे. आमचे सीएनजी ऑपरेटेड मॅक्सिमा कार्गो घरातील दारात सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवतील. जनजागृतीसाठी आणि “हर घर जल अभियान” साठी एकत्र काम करण्यासाठी आम्ही जनजल डब्लुओडब्लुला पाठिंबा देऊ.

जनजल डब्लुओडब्लु पाण्याची टाकी क्षमता ६०० लिटर आहे. लोकांच्या घरी दररोज २५०० लिटर पर्यंत सुरक्षित पाणी पोहोचविण्याचा याचा हेतू आहे. प्रत्येक जनजल हे तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही अनधिकृत रीफिलिंगपासून बचाव करते आणि अशा प्रकारे बीआयएस आणि डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार सुरक्षित पेयजल वितरण सुनिश्चित करते.

डॉ. पराग अग्रवाल पुढे म्हणाले, “जनजल डब्लुओडब्लु, मोबाइल वॉटर एटीएमप्रमाणे कार्य करते जे सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे घरपोच वितरण करते. स्वयंपाकासाठी, पिण्यायोग्य दररोजचे पाणी सुरक्षित करणे भारतातील बर्याच भागात आजही एक आव्हान असू शकते. विशेषत: ग्रामीण भागात पाण्याचा स्त्रोत सहसा वस्त्यांपासून दूर आणि लक्षणीय अंतरावर आढळतो,जनजल डब्लुओडब्लु हे पर्यावरण अनुकूल असे तीन चाकी वाहन लोकांच्या दारात पाणी पोहचविण्याच्या उद्देशाने आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून सुरक्षित पाण्याचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले. ”

ते पुढे म्हणाले: “आम्ही सध्या सेफ वॉटर एन्टरप्रायजेसच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुमारे ५ कि.मी.च्या परिघात जनजल वॉटर ऑन व्हील्स तैनात करून त्यांच्या विद्यमान क्षमतेचा उपयोग करण्यासाठी मदत करीत आहोत. या सुरक्षित पाण्याच्या उपलब्धतेमुळे कोट्यावधी नागरिकांवर चांगले परिणाम होतील, याचबरोबर असुरक्षित पाण्याचे स्त्रोत आणि महागड्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यावरील अवलंबन कमी होईल. संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोविड -१९ चे सर्वात मोठे कारण म्हणजे शुद्ध न केलेल पाणी आहे. ”

Leave a Reply

%d bloggers like this: