प्रेमाचा अनोखा रंग दाखविणारा ‘प्रीतम’ चित्रपटगृहात

प्रेम ही भावनाच मनात तरंग उमटवणारी आहे . आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमात पडतोच , ‘ आपलं कुणीतरी असण ‘ … त्या आपल्या प्रेमाच्या माणसासाठी काहीही करणं . त्यात स्वतःला विसरून जगणं , या साऱ्या गोष्टीतून मोरपंखी प्रेमाच्या नात्याचा रेशमीबंध आपसूकच विणला जातो . असं म्हणतात , ‘ प्रेमाला वय नसतं . प्रेमाला रंग नसतो , प्रेमाला फक्त भावनेचा गंध असतो . प्रेमभावनेचा हा वेगळा रंग आणि त्या नात्यातील नाजूक रेशीमबंध उलगडून दाखवणारा ‘ प्रीतम ‘ हा मराठी चित्रपट १ ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय , ‘ अॅड फिल्ममेकर ‘ दिग्दर्शक सिजो रॉकी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


विझाई प्रोडक्शन च्या बॅनरखाली ‘ प्रीतम ‘ चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे . प्रेम ही भावना कालातीत आहे पण त्याचा आविष्कार वेगवेगळा असू शकतो . प्रेमाचे सूर कधी आणि कोणासोबतही जुळू शकतात , ‘ प्रीतम ‘ चित्रपटातील कहाणी अशाच दोन प्रेमीयुगलाची आहे . सौंदर्याचे काही एक निकष आपल्याकडे ठरले आहेत पण त्यापलीकडे प्रेमाचा खरा रंग त्यातील सच्चेपणाचा अनोखा बंध उलगडणारी हृदयस्पर्शी प्रेमकहाणी म्हणजे ‘ प्रीतम ‘ हा चित्रपट , रंगरूपापलीकडचा प्रेमभावनेचा वेगळा अर्थ प्रीतम आणि सुवर्णाच्या प्रेमकथेतून हा चित्रपट मांडतो . कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेदेकर ही फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे . त्याच्यासोबत उपेंद्र लिमये , अजित देवळ , विश्वजीत पालव , समीर खांडेकर , आभा वेलणकर , शिवराज वाळवेकर , अस्मिता खटखटे , नयन जाधव , आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत . वाटा – आडवाटावरचे निसर्गसौंदर्य , विस्तीर्ण व मनाचा ठाव घेणारे सागरकिनारे अशी कोकणातील विविध मनोहारी लोकेशन्स ‘ प्रीतम ‘ चित्रपटातून दिसणार आहेत , सोबत सुमधूर गीतसंगीताचा सुरेल नजराणा या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे . शुक्रवार १९ फेब्रुवारीला ‘ प्रीतम ‘ आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: