Saturday, May 30, 2026
PUNE

पुण्यात गुरूवार दि.११ फेब्रुवारी रोजी “या” भागाचा पाणीपुरवठा असणार बंद

पुणे, दि. ९ – गुरूवार दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी वडगांव जलकेंद्र परिसर व चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहराच्या भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच शुक्रवार दि.१२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग केली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग..

वडगांव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगांव पठार, दत्तनगर ,धनकवडी, कात्रज , भारती विद्यापिठ परिसर, कोंढवा बु इत्यादी.

चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर इत्यादी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading