Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटच्या चौकशीच्या आदेशावर भडकले देवेंद्र फडणवीस

मुंबई : सेलेब्रिटींच्या ट्विटरवरून सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये चांगलीचं जुंपली आहे. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापताना शरम वाटली पाहिजे, असं  वक्तव्य विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस केलं आहे. कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाने देशव्यापी स्वरूप घेतल्यानंतर सर्वच स्तरातील मंडळी आपलं मत मांडत आहेत. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि विराट कोहली यांच्या सहीत अन्य सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

सरकारच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आहे. ते म्हणाले ‘निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर नाही. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थिस्तीचीच चौकशी केली पाहिजे.’ असं ट्विट फडणवीस यांनी केलं. 

दरम्यान, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि विराट कोहली यांच्या सहीत अन्य सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी एका आशयाचे ट्वीट केले होते.

या सेलिब्रिटींच्या ट्वीटचे बरेचसे शब्द कॉमन होते.  #IndiaTogether आणि #indiaAgainstPropganda या हॅशटॅगचा वापर करत ट्वीट केले. भारताचे हे अंतर्गत प्रकरण असल्याचे त्यांनी म्हटले. या सेलिब्रिटींनी दबावात येऊन ट्वीट केले. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कॉंग्रेसने केली. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading