भारतरत्नांच्या ‘स्वेच्छा – अभिव्यक्तीत्वाची खातरजमा’ हे राजधर्माचे पालन – गोपाळदादा तिवारी

पुणे दि. ९ – ‘राज्यातील ‘भारतरत्नां वर / कलावंतांवर’ दबावाने आपल्या मर्जी प्रमाणे कोणी ‘कॅापी पेस्ट’ “ट्वीट” करवत असतील वा करण्यास बाध्य करत असतील, तर त्याची ‘चौकशी होणे हा भारतरत्नांचा अपमान नाही’..! कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व सुरक्षेची खातरजमा करणे हे सत्तेत्या जराजधर्माचे पालनच् आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आज पुणे येथे केले..!

भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या ‘भारतरत्नांच्या अपमान’विषयी केलेल्या निवेदनावर ‘काँग्रेसचे राज्य प्रवक्ते’ गोपाळदादा तिवारी यांनी आज पुणे येथे वरील प्रमाणे निवेदन केले..
देशभरातील करोडों नागरीकांचे “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” सरसकटपणे ट्वीटर वर व्यक्त होत असतांना, ‘ट्वीटर खाते बंद करू’(?) म्हणून नोटीस देणाऱ्या ‘मोदी – शहांच्या’ केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे, ७० वर्षे लोकशाही नांदत असलेल्या देशात ‘धाक-दपटशहा व मनमानी’चालू शकत नाही, याचे ही ऊचीत भान ठेवणे आवश्यक आहे. माननीय ‘भाषणजीवी प्रधानसेवकांनी’ लोकसभेतून देशाला संबोधित करण्या ऐवजी, त्याच वेळी ‘कृषी-बिलावर चर्चा घडवून ‘राज्यसभेतील विरोधी सदस्यांच्या’ शंकांचे निरसन केले असते व घटनात्मकरीत्या
विधेयक मंजूर वा नामंजूर केले असते तर आज एवढी कसरत करावी लागली नसती..!! असे ही गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दीलेल्या निवेदनात सांगीतले आहे..

Leave a Reply

%d bloggers like this: