भारतीय लघु उद्योगांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळवून देणारे अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्क

मुंबई , दि. ९ – व्यवसाय विस्तारासाठी गाठीभेटी होणे गरजेचे आहे असा सगळ्यांचा सर्वसाधारण समज होता, पण कोव्हिड१९ पश्चात आता ही मानसिकता बदलली आहे. तुमच्या लहान-मोठ्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्कने ही संधी तुम्हाला अगदी सहजरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय आणि राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसाय विस्तार करणे आता भारतीय लघु व मध्यम उद्योजकांसाठी आता खूप सोपे झाले आहे. 

ब्ल्यूमार्क ने उद्योजकांसाठी अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्क  (एबीएन)  ही सेवा देऊ केली आहे. या  अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्कमध्ये अमेरिका, स्विडन, दुबई, सिंगापूर, जिनिव्हा, घाना, केन्या अशा विविध देशांसह जगभरातील ५० हजाराहून अधिक व्यावसायिक जोडले गेले आहे. भारतीय उद्योगांना,  मग तो व्यवसाय लहान असो किंवा मोठा, जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना अमाप संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने एबीएन ची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील ग्राहकांपर्यंत सहजरित्या पोचता यावे यासाठी एबीएन चे व्यासपीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यासाठी एबीएन ने तंत्रज्ञानाधारित अत्याधुनिक संसाधनांचा वापर करून प्लॅटफाॅर्म विकसित केला आहे. 

एबीएनच्या मदतीने शेकडो भारतीय उद्योगांना अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया, आशियाई आणि मध्य पूर्व देशांतील ग्राहकांपर्यंत दररोज पोचता येत आहे. आणि हे करण्यासाठी खूप मोठ्या बजेटची तरतूद करण्याचीही आवश्यकता नाही. अॅब्लिफ्री या ग्लोबल नेटवर्किंग अॅप आणि अॅब्लिएक्स्पो या ग्लोबल प्रदर्शन व्यासपीठाच्या संयुक्त माध्यमांतून लघु व मध्यम उद्योग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोचत आहेत. 

एबीएन मार्फत लघु उद्योगांना डिजिटली फिट होण्यासाठी ही मदत केली जात आहे. सर्वसाधारणपणे लघु उद्योगांकडे त्यांच्या स्थानिक परिघाबाहेर विस्तारण्यासाठी आवश्यक असलेला डिजिटल फिटनेस उपलब्ध नसतो. तो आणण्यासाठी एबीएन त्यांना मदत करते. तसेच नव्या बाजारपेठेत आणि व्यवसाय विस्तारण्यासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहाय्य लघु उद्योगांकडे नसते. ती मदत या उद्योगांना एबीएन च्या ग्लोबल एक्सपर्ट नेटवर्कच्या माध्यमातून केली जाते. 

एबीएनचे सीईओ गोविंदा सदामते म्हणाले, एबीएनच्या ग्लोबल नेटवर्कचा सदस्य होण्याची संधी सर्व व्यावसायिकांना विनाशुल्क उपलब्ध आहे. आमच्याशी संपर्क साधून किंवा अॅब्लिफ्रीचे मोबाईल अॅप्लिकेशन डाउनलोड करून व्यावसायिक या नेटवर्कचे सदस्य बनू शकतात. त्यापुढे त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी एबीएन तज्ज्ञांची टीम काम करते. आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी सर्वप्रथम लघु व मध्यम उद्योगांची भरभराट होणे गरजेचे आहे. त्यासाठी एबीएन प्रयत्नशील आहे. 

एबीएनचे व्यवस्थापकीय संचालक संजय लांडगे म्हणाले, एबीएनच्या सदस्यांसाठी फायदेशीर ठरेल असे आॅनलाईन प्रदर्शनही वेळोवेळी भरविण्यात येते. या प्रदर्शनांद्वारे सदस्यांना राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवरील अन्य सदस्य आणि ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी मदत होते. त्यासाठी पारंपरिक पद्धतीने कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अगदी कमी खर्च करावा लागतो.   

अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्क ची अधिक माहितीसाठी  www.ablifree.com  या वेबसाईट वर  किंवा मोबाईल  क्रमांक ८०८० ८४८५६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन कंपनी तर्फे करण्यात आले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: