पोस्टकार्डपासून क्लासमेट्सपर्यंतच्या 5 मराठी फिल्म्स ज्या अमेझॉन प्राईम व्हीडियोच्या नवीन मोबाईल एडिशनवर पाहता येणार

एखादी स्ट्रिमिंग सर्विस म्हणजे केवळ हिंदी किंवा इंग्रजीत मूव्हीज आणि सिरीज पाहण्याची सोय, इतपतच तुमचा विचार असेल… तर थांबा! तुम्ही चुकत आहात!! कंटेंट लायब्ररी म्हटली की, त्यात वैविध्य आलेच.. आणि अमेझॉन प्राईम व्हीडियो म्हणजे तर प्रादेशिक कंटेंटचा खजिनाच आहे. या पर्यायाला तोडच नाही. मग मराठी, गुजराती, बंगाली असो किंवा चार दक्षिण भारतीय बोलीभाषा.. एक प्रेक्षक म्हणून स्थानिक भाषांचे गुच्छ याठिकाणी उपलब्ध आहेत. केवळ एका क्लिकवर अनेक प्रकार इथे मिळतील. जर काही सर्वोत्तम मराठी सिनेमे पाहण्याचा मूड असेल तर मग तुमच्याकरिता प्राईम व्हीडियो हा पर्याय योग्य ठरतो. आणि केवळ हीच एक सदाबहार भेट नाही. त्यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या मोबाईल आवृत्तीचे आभार! काही दर्जेदार ‘मी’ टाईमची मजा अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब करू नका. एअरटेल प्रीपेड सबस्क्रायबर म्हणून केवळ रु. 89 मध्ये मोबाईल एडिशनचे स्ट्रीम तुम्हाला करता येईल.

पोस्टकार्ड  

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या सिनेमात राधिका आपटे, सुबोध भावे, गिरीश कुलकर्णी आणि विभावरी देशपांडे यांची भूमिका असून हा प्रवास तुमच्या आत्म्याला सुखावणारा तसेच तुमच्या मनाला आनंदी करणारा आहे. आपली आयुष्ये पत्रांवर अवलंबून असतात आणि त्यातून खोल अंतरंगातील भावनांचा संवाद चालतो हे सिनेमाचे कथासूत्र आहे. पोस्टकार्ड आणि पोस्टमन या एकसमान धाग्याशी तीन निरनिराळ्या कथा बांधलेल्या आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाला या सिनेमातून महत्त्वाचा संदेश मिळतो, शिवाय ही कलाकृती आपल्या चेहऱ्यांवर हास्य फुलवते.


कौल – अ कॉलिंग    

कौल ही कलाकृती जर्मन तत्त्वज्ञ नित्शे याच्या तत्त्वज्ञान आणि संकल्पनांवर आधारीत आहे. या सिनेमात रोहित कोकाटेने अभिनय साकारला असून आदिश केळुस्कर याने दिग्दर्शनाचा प्रांत आजमावण्याची ही पहिलीच वेळ. या सिनेमांतून दीर्घ आणि विस्तारलेले प्रसंग आशयाची खोली उलगडत जातात. सिनेमाचे संवाद दृश्यांसमवेत समतोल राखतात. या सिनेमाने कथाकथनाची निराळी वाट निवडली असल्याने प्रसंगातील नेमकेपण हेरण्यासाठी बिटवीन द लाईन्स आकलन महत्त्वाचे ठरते. सिनेमाला वेगळ्याप्रकारे हाताळल्याने अशा कलाकृती अनेक पैलूंचे दर्शन घडवतात.

आप्पा आणि बाप्पा 

ही निखळ विनोदी कलाकृती गणपत्ती बाप्पासोबत भेट घडवून आणते. एका मनुष्याच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी याकरिता हा इसम भव्य पूजेचे आयोजन करतो. शंभर माणसांची जेवणावळ उठवण्याचा घाट घालतो. त्यातून धमाल मजा घडते, जी तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडते.

क्लासमेट्स 
या सिनेमाच्या नावावरून समजते की, कॉलेजच्या मस्तीचे दिवस, रम्य कल्पना आणि जगाची दिशा बदलण्याचा विचार करणारी सळसळती तरुणाई हा या कलाकृतीचा विषय आहे. हा एका मल्याळम फिल्मचा रिमेक असून तो मराठीतही चांगला हाताळण्यात आला. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या सिनेमात महाविद्यालयीन जीवनातील सगळे पैलू- निरनिराळे विद्यार्थी, निवडणुका, नाटके, भाव-भावना आणि धमाल मस्तीचे दर्शन घडते.


भारतीय

जेव्हा तुम्हाला क्वालिटी टाईम व्यतीत करायची इच्छा होते, त्यावेळी खदाखदा हसायला भाग पाडणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे कथासूत्र आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. एक इसम आपली वडिलोपार्जित संपत्ती ताब्यात घेण्यासाठी गावात परततो. त्याच्या समोर आव्हानांचे डोंगर असतात. या क्लिशेने सिनेमाला निराळा, विनोदी बाज मिळवून दिला आहे. पुरेपूर हसवणूक करणाऱ्या या सिनेमाचे कथासूत्र रंजक आहे.           

Leave a Reply

%d bloggers like this: