पद्मश्री शितल महाजन, डॉ.सुचेता चापेकर, रुबल अग्रवाल यांना स्त्री शक्ती सन्मान

वैशाली भांडवलकर, छाया जगताप, आरती कपाले, डॉ.प्रियंका नारनवरे मानकरी

पुणे : देशाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने राहिले आहे. त्यामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून उत्तुंग भरारी घेणा-या महिलांचे कार्य समाजासमोर यावे, याउद््देशाने सुरु केलेल्या सन्मान स्त्री शक्तीचा या सोहळ्यात यंदा सात महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक आरती दातार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. 

नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे दरवर्षी स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. कला, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, प्रशासन व उद्योग क्षेत्रातील महिलांचा गौरव यानिमित्ताने केला जातो. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  
क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री शितल महाजन, नृत्यांगना गुरु डॉ.सुचेता चापेकर, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भांडवलकर, आरोग्य क्षेत्रातील छाया जगताप, आरती कपाले, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उपरणे, सन्मानचिन्ह, पैठणी साडी असे सन्मानाचे स्वरूप आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: