‘ट्वीट करण्यापूर्वी शेतकऱ्यांची परीस्थिती बघा’ संजय राऊतांचा सेलिब्रिटींना सल्ला

मुंबई, दि. 4 – कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे. त्याच बरोबर लता मंगेशकर यांनी देखील यावर ट्वीट केले आहे.

यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला शेतकरी आंदोलनामध्ये पाठींबा देणाऱ्या सेलिब्रेटींना टोला लगावला आहे. आपण शेतकर्यांनी पिकवलेल्या अन्नावर जगतो. जगभरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. मात्र यावेळी सेलिब्रेटींनी सरकारला पाठींबा देताना आज दिल्लीच्या सीमांवर जाऊन शेतकऱ्यांची स्थिती जाऊन जाणून घ्यावी आणि मग मत व्यक्त कराव असा सल्ला यावेळी रा ऊत यांनी दिला. तर सेलिब्रेटींना सरकारने सेलिब्रेटी केलेले नाही लोकांनी केले आहे. ही आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: