सोनालिका सीएसआरमार्फत बांधण्यात आलेल्या आंगणवाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. 3 – देशामध्ये सुदृढ समाजाच्या निर्माणासाठी नेहमीच कटिबद्ध असलेल्या आणि कृषी क्षेत्राद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आघाडीवर असलेली सोनालिका ट्रॅक्टर्स ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमातून (सीएसआर) पुणे जिल्ह्यातील बारामती येथील माळेगावमध्ये आंगणवाडी बांधली आहे. कुपोषणाच्या विषयामध्ये लहान मुलांसाठी काम करून माळेगाव परिसरामध्ये मूलभूत बालक-केंद्रित सेवा सुविधा या उपक्रमाद्वारे देण्यात येणार आहेत. 

भारतासह सर्व विकसनशील देशांमध्ये बालकांची सुशृषा आणि संगोपन हा महत्त्वाचा विषय आहे. लहान मुलांच्या दृष्टीने पोषक आहार, आरोग्य सेवा आणि सुशृषा अशा मूलभूत सुविधांचा अभाव भारतातील अनेक भागात आजही आढळून येतो. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे आणि विशेषतः ग्रामीण भागांमध्ये त्यादृष्टीने काही पावले उचलण्याचीही नितांत आवश्यकता आहे. समाजामध्ये महत्त्वाचे आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी सोनालिका सीएसआरमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. 

पवार म्हणाले, “पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे. आंगणवाडीसारख्या उपक्रमांमुळे लहान मुलांच्या निगडित सुविधांमध्ये केवळ सुधारणा होणार नाही तर प्रत्यक्षात देशाचा विकास होण्यासाठी सक्षम बनविण्यात मदत होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये माळेगाव येथे आंगणवाडीचा उपक्रम सोनालिका सीएसआरने हाती घेतला याचा मला आनंद आहे. या गावांच्या परिसरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या आंगणवाडीची मदत होईल अशी मला आशा आहे.”

याप्रसंगी बोलताना सोनालिका सीएसआरच्या संचालिका सुरभी मित्तल म्हणाल्या, “समाजाच्या शाश्वत भवितव्याची निर्मिती करण्याची जाणीव सोनालिका सीएसआरला आहे. हाच विचार करून भारताच्या ग्रामीण भागांमध्ये लहान मुलांच्या दृष्टीने सुविधा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये माळेगाव येथे आंगणवाडी बांधण्यात आली असून ती एक सुरवात आहे. लहान मुलांना त्यांच्या जन्मसिद्ध हक्कांपासून ते प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी या उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातील. लहान मुलांचे पोषण, पूर्व-प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी, आहार, सुशृषा या दृष्टीने सुविधा निर्मितीसाठी माळेगाव हे एक माॅडेल म्हणून काम करेल. वेळात वेळ काढून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आंगणवाडीचे उद्घाटन केले याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत व त्यांच्यामुळे आमच्या टीमचे मनोधैर्य उंचावले आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: