‘सूर्यदत्ता’तर्फे शिलाई मशीनचे वाटप

पुणे, दि. 2 – सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे (एसआयएफटी) सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत (सीएसआर) छावा फाउंडेशनला तीन शिलाई मशीन देणगीरूपात देण्यात आल्या.

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने या शिलाई मशीन देण्यात आल्या आहेत. सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव आणि ‘एसआयएफटी’च्या विभागप्रमुख प्रा. मोनिका कर्वे यांनी छावा फाउंडेशनचे पी. सी. घाडगे पाटील यांच्याकडे या मशीन सुपूर्त केल्या.
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कोरोना काळात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने पत्नी व कुटुंबीयांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. अशावेळी या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या शिलाई मशीनची भेट देण्यात आली. त्यांनी उत्तम शिलाई काम शिकावे आणि स्वावलंबी बनावे, यासाठी सदैव सहकार्य करणार आहोत. यातून या महिला आत्मनिर्भर बनतील.”

Leave a Reply

%d bloggers like this: