fbpx
Friday, April 26, 2024
ENTERTAINMENT

‘पॅरिस प्ले फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये होणार ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ चा वर्ल्ड प्रिमियर

अभय ठाकूर दिग्दर्शित ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ या शॉर्टफिल्मने जगभरातील विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला अमिट ठसा उमटवत उतुंग कामगिरी बजावली आहे. मानसिक आरोग्यावर भाष्य करणार्‍या या शॉर्टफिल्मचा येत्या शनिवारी (6 फेब्रुवारी) वर्ल्ड प्रिमियर अतिशय प्रतिष्ठेच्या ‘पॅरिस प्ले फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये होणार असून चाहत्यांना घरी बसून या शॉर्टफिल्मचा आनंद घेता येणार आहे.

‘पॅरिस प्ले फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये जगभरातून आलेल्या अनेक शॉर्टफिल्म्स मधून 14 देशातील 28 शॉर्टफिल्म्सची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ या एकामेव भारतीय शॉर्टफिल्मची निवड सेमी फायनालिस्ट म्हणून करण्यात आली आहे. या शॉर्टफिल्मचे ऑनलाइन प्रेक्षपण येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती निर्माता, दिग्दर्शक अभय ठाकूर यांनी दिली. तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या ‘न्यू जर्सी फिल्म अवॉर्डस’ मध्ये फायनालिस्ट म्हणून ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ दाखवण्यात आल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ ने यापूर्वी वर्ल्ड फिल्म कार्निव्हल, सिंगापूर, कोलकाता इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्डस, टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, यूरोपियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल युके, यूरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड अॅमस्टरडॅम, फेस्टिव्हल, उरूवती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, तामिळनाडू, L’Age d’Or International Arthouse Film Festival – Kolkata, पोर्ट ब्लेयर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डस, ओनिरस फिल्म अवॉर्डस मॅनहॅटन, न्यूयॉर्क इत्यादि फिल्म फेस्टिव्हल्समध्ये ऑफिशियल निवड, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह 25 हून अधिक विविध पारितोषिके पटकावली आहेत.

ड्रीम कॅचर मोशन पिक्चर कंपनी, स्नोफ्लेक स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ ची कथा, संवाद अर्जुन प्रधान यांची असून अभय ठाकूर आणि अजित ठाकूर यांचे पटकथा व संवाद मध्ये योगदान आहे. तर सिनेमॅटोग्राफी आशिष मेस्त्री यांची आहे. मानसिक आरोग्यावर वेगळ्या अंदाजात भाष्य करणार्‍या या शॉर्टफिल्म मध्ये रुचिता जाधव, यतीन कार्येकर, अनन्या सेनगुप्ता, शंतनु मोघे, मीरा पाथरकर, रणजीत जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading